तरुण भारत

दिलासादायक : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54 %

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 15 हजार 169 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 29 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 लाख 76 हजार 184 वर पोहचली आहे.

Advertisements

 
दरम्यान, कालच्या दिवशी 285 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.67 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 54 लाख 60 हजार 589 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 94.54 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 2,16,016 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 55 लाख 14 हजार 594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16.26 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 87 हजार 643 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 07 हजार 418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

Related Stories

भारत देणार बांग्लादेशला 10 रेल्वे इंजिन

datta jadhav

अल्पवयीन विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

कोल्हापूर : गणी आजरेकरांनी बदनामीचा दावा करून दाखवावाच

Abhijeet Shinde

महिलांना बळ देणारा ‘शक्ती कायदा’ मंजूर

Sumit Tambekar

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

Rohan_P

अमरिंदर सिंग यांच्याकडून काँग्रेसचा राजीनामा; नव्या पक्षाचीही घोषणा

datta jadhav
error: Content is protected !!