तरुण भारत

पिसुर्ले बेकायदेशीर चिरेखाणीच्या खंदकात महिलेची आत्महत्या

यावर्षातील पहिला बळी. पिसुर्ले पंचायतीने चिरेखाणीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

प्रतिनिधी / वाळपई

Advertisements

 सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणीवर कारवाई करून त्या बंद करण्याची मागणी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने होत आहे. शेवटी पंचायत मंडळाने यासंदर्भात तक्रार करून या चिरेखाणी बंद करा अथवा त्याठिकाणी घातपात झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला होता. याकडे संबंधित खात्याने  दुर्लक्ष केल्यामुळे आज सदर बेकायदेशीर खाणीवर काम करणाऱया अंजली राजू जाधव या 16 वषीय महिलेने आत्महत्या केल्यामुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर चिरेखाणीचा मुद्दा प्रकाशझोतात आलेला आहे. यामुळे सरकार आता तरी बेकायदेशीर चिरेखाणीचा मुद्दा गांभीर्याने घेऊन या भागातील जनतेच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने लक्ष देणार का अशाप्रकारचा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 याबाबतची माहिती अशी की पिसुर्ले आवडार या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या पाण्याने भरलेल्या खंदकामध्ये अंजली जाधव या 16 वषीय महिलेने आज सकाळी आत्महत्या केली. सदर महिला बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याचे पति व  इतरानी केला असता तिचा मृतदेह एका पाण्याने तुडुंब भरलेल्या खंदकामध्ये तरंगताना आढळला .

यासंदर्भाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी हजर झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून संध्याकाळी उशिरा पाण्यामधून सदर मृतदेह बाहेर काढला.

सदर कुटुंब मुळ कर्नाटक बिजापूर भागातील आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राजू व त्यांची पत्नी अंजली गेल्या अवघ्याच वर्षापासून सदर भागांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीवर मजूर म्हणून काम करीत होते .त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीमध्ये तिने आत्महत्या केल्यामुळे सरकारचे यंत्रणेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज अंजलीचा जीव गेल्याची चर्चा नागरिकात व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या व्यवसायावर सरकार खरोखरच कारवाई करणार का  ? असा  सवाल व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्याचिरेखाणीवर हा आत्महत्या करण्याचा प्रकार झालेला आहे त्याजमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान याबाबत पिसुर्ले पंचायत मंडळाने तीव्र स्वरूपाची नाराजी व चिंता व्यक्त केलेली आहे. पंधरा दिवसापूर्वी या भागातील चिरेखाणी पावसाळी मोसमामध्ये नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनण्याची शक्मयता असल्याने सदर चिरेखाणी बंद कराव्या व चिरेखाणी  सभोवताली संरक्षण कुंपण उभारावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या बेकायदेशीर चिरेखाणीच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी पंचायत मंडळाने केली होती .मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या वर्षातील अंजलीच्या नावाने पहिला बळी गेल्याची   प्रतिक्रिया पंचायत मंडळाने व्यक्त केलेली आहे. सरकारची यंत्रणा आता तरी जागी होणार का अशा प्रकारचा सवाल पंचायतीच्या पंच सभासदांनी व्यक्त केलेला आहे.

दरम्यान घटनेचा पंचनामा वाळपईच्या पोलिसांनी केला असून मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आलेला आहे.

Related Stories

साटरे येथील डोंगराचे भूस्खलन

Omkar B

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

Patil_p

भाजप सरकारकडून जनतेची लूट

Amit Kulkarni

राज्यात जमीन रुपांतरणाचा सपाटा

Patil_p

जनतेच्या आशा, अपेक्षा पुर्ण करण्यासाठी वचनबद्ध–विश्वजीत राणे

Amit Kulkarni

भंडारी केंद्रीय समितीकडून पैशांच्या व्यवहारात घोळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!