तरुण भारत

अर्थसंकल्प विभागाचे माजी संयुक्त सचिव आनंद शेरखाने यांचे निधन

प्रतिनिधी / पणजी

सांख्यिकी आणि नियोजन खात्याचे माजी संचालक आणि अर्थसंकल्प विभागाचे माजी संयुक्त सचिव आनंद शेरखाने यांचे नवी दिल्लीत निधन झाले.

Advertisements

नवी दिल्लीतील कुशल विकास खात्यात अतिरिक्त आयुक्त म्हणून ते काम करीत होते व त्यांच्या निवृत्तीस अद्याप 5 वर्षे शिल्लक होती. गोव्यात असताना त्यांनी नियोजन व सांख्यिकी विभागाचे संचालक म्हणून अनेक वर्षे सेवा केली. वित्तीय क्षेत्रातले असल्यने मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्याकडे अर्थसंकल्प हा विभाग सोपविला व या विभागाचे ते संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहिले. शेरखाने यांच्याच कारकिर्दीत पर्वरी येथे पं. दिनदयाळ उपाध्याय सांख्यिकी भवन या खात्याच्या स्वतःच्या वास्तुची निर्मिती झाली.

सांख्यिकी खात्यातर्फे जी काही सर्वेक्षणे गोव्यात झाली त्या सर्वांचे नियोजनबद्द   असे काम त्यांनी केले व सरकारला अहवालही सादर केले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या काहीजण गैरफायदा घेत होते त्यामुळे सरकारने सर्वेक्षणाचे आदेश दिले असता शेरखाने यांच्याच नेतृत्वाखाली सर्वेक्षण पूर्ण होऊन सरकारला अहवाल सादर केला त्यामुळेच दरमहा सरकारचे 7 ते 8 कोटी रुपये वाचले होते.

इ.स. 2016 मध्ये त्यांची गोव्यातून नवी दिल्लीत बदली झाली तेव्हापासून ते दिल्लीतच होते. गेला दीड महिना दिल्लीतील एका इस्पितळात त्यांच्यावर कोविडबाबत उपचार चालू असता बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

Related Stories

पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघात 70 टक्केपेक्षा कमी मतदान

Patil_p

जनतेने दिव्यांगांना प्रोत्साहन द्यावे

Patil_p

माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची प्रकृती बिघडली

Patil_p

इनरव्हील क्लब ऑफ म्हापसा एलिटतर्फे निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

आयडियल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Amit Kulkarni

शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिले शिक्षणाचे धडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!