तरुण भारत

गांधीनगर येथे पाण्याचा अपव्यय

बेळगाव : पाण्याची प्रचंड नासाडी हे बेळगावचे वैशिष्टय़ ठरले आहे. कुठेतरी जलवाहिनीला गळती लागलेली असते किंवा कुठेतरी पाण्याचा व्हॉल्व फुटलेला असतो. गांधीनगर येथे असाच व्हॉल्व फुटून पाणी प्रचंड प्रमाणात वाया जात आहे. पाणी जाण्याचे प्रमाण इतके आहे की गांधीनगरजवळील ब्रिजखाली पाणी साचले आहे. गांधीनगर येथील व्हॉल्व फुटून पाईपलाईनमधून पाणी प्रचंड वेगाने बाहेर येत आहे. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणीपुरवठा मंडळाने त्वरित याची दखल घेऊन पाण्याची नासाडी थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

Related Stories

कोरोनाने रोखली ‘पंढरीची’ वाट, वारकरी रमले ‘पारायणात’

Amit Kulkarni

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागरी पौर्णिमा

Amit Kulkarni

निपाणी येथील दलित क्रांती सेनेचे निवेदन

Patil_p

पांडुरंग सीसी चिकोडी, नरवीर, साईराज, मराठा संघ उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

उर्वरित नुकसानग्रस्तांनाही मदत लवकरच

Patil_p

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर पार पडली कार्यशाळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!