तरुण भारत

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल

लंडन : भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लिश भूमीत दाखल झाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार असून त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यात लढेल. दुसरीकडे, महिला संघ यजमान महिला संघाविरुद्ध 3 वनडे, 3 टी-20 सामने व 1 कसोटी खेळणार आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल दि. 18 जूनपासून साऊदम्टनवर खेळवली जाणार आहे तर महिला संघातील पहिला सामना दि. 16 जून रोजी ब्रिस्टॉन येथे होणार आहे. आघाडीचा फलंदाज केएल राहुलने इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर चार्टर्ड फ्लाईटच्या बाजूला घेतलेले छायाचित्र ट्वीटरवर पोस्ट केले.

Advertisements

 शिवाय, ‘टचडाऊन’ असा संदेश दिला. दोन्ही संघ आता साऊदम्प्टनला रवाना होणार असून ते सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण करतील. क्वारन्टाईन पूर्ण करुन कोव्हिड-19 चाचणी झाल्यानंतर विराट कोहलीचा संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये उतरणार आहे.

ही फायनल झाल्यानंतर भारताचे इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामने होणार आहेत. भारतीय पुरुष संघात 20 सदस्यांचा समावेश आहे. महिला संघाचा दौरा दि. 15 जुलै रोजी संपणार आहे.

104 दिवस, 6 कसोटी सामने!

  • अलीकडील कालावधीत भारतीय क्रिकेट संघाचा हा प्रदीर्घ दौरा असणार आहे. 104 दिवसात भारतीय संघ एकूण 6 कसोटी सामने खेळेल. यात न्यूझीलंडविरुद्धची फायनल टेस्ट व इंग्लंडविरुद्ध 5 लढतींचा समावेश असणार आहे.
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल दि. 18 ते 22 जून या कालावधीत रंगणार असून दि. 23 जूनचा दिवस राखीव असणार आहे.
  • भारत इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी 4 ऑगस्ट रोजी नॉटिंगहम येथे खेळेल. याचाच अर्थ असा की, न्यूझीलंडविरुद्ध फायनल झाल्यानंतर तब्बल 42 दिवसांनी भारत-इंग्लंड मालिकेला सुरुवात होईल.
  • भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी व शेवटची कसोटी मँचेस्टर येथे दि. 14 सप्टेंबर रोजी संपेल आणि त्यावेळी भारताचा 104 दिवसांचा हा प्रदीर्घ दौरा पूर्ण होईल.
  • 104 दिवसांच्या या प्रदीर्घ दौऱयाने महायुद्धापूर्वीच्या प्रदीर्घ दौऱयांना उजाळा मिळणार आहे. त्यावेळी संघांचा प्रवास जहाजाने असायचा आणि दौरे देखील 100 पेक्षा अधिक दिवसांचे असायचे.

Related Stories

आय लीगचा प्रारंभ 9 जानेवारीपासून

Patil_p

सध्या न खेळणेच योग्य : यूएसटीए

Patil_p

उरूग्वेला हरवून कोलंबिया उपांत्य फेरीत

Patil_p

चोप्रा, हिमा दास तुर्की दौऱयासाठी सज्ज

Patil_p

सानिया-मॅकहॅले अंतिम फेरीत

Patil_p

इंडोनेशियाकडे थॉमस तर जपानकडे उबेर चषक

Patil_p
error: Content is protected !!