तरुण भारत

केजरीवाल सरकारने लपविला कोरोनाबळींचा आकडा

भाजपकडून आरोप : 34 हजार मृत्यूप्रमाणपत्रे प्रदान, 9 हजार बळींचीच माहिती जाहीर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोरोनाकाळात गंभीर निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा कमी दाखविण्यात आल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत केला आहे.

दिल्लीतील 3 महापालिकांनी 2 महिन्यात 34,750 मृत्यू प्रमाणपत्रे दिली आहेत. इतक्या संख्येत मृत्यू प्रमाणपत्रे वितरित होऊनही दिल्ली सरकार कोरोनामुळे 9,916 मृत्यू झाल्याचे सांगत आहे. अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीच्या घराघरांमध्ये ऑक्सिजनची होम डिलिव्हरी करण्याचे आश्वासन दिले होते. पण आता ते ऑक्सिजनऐवजी मद्याची होम डिलिव्हरी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

एकही नवे रुग्णालय नाही

कोरोनामुळे मृत्यूप्रकरणी दिल्ली (2.9 टक्के) देशात पहिल्या स्थानी तर पंजाब (1.3 टक्के) दुसऱया स्थानावर आहे. अखेर दिल्लीत कोरोनामुळे इतके अधिक बळी का जात आहेत? केजरीवाल वारंवार तिसऱया लाटेची तयारी करत असल्याचे सांगतात. दुसऱया लाटेपूर्वीही त्यांनी हेच म्हटले होते. दिल्लीत 2015-19 दरम्यान एकही नवे रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. जुलै 2020 ते एप्रिल 2021 पर्यंत एकही नवा व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आला नसल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

भीतीने ऑडिट टाळले

दिल्लीत 44 नवे ऑक्सिजन प्रकल्प स्थापन करणार असल्याचे केजरीवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते. पण 2 महिन्यात एकही प्रकल्प सुरू झालेला नाही. केजरीवाल सरकारचे हे गचाळ व्यवस्थापन आहे. दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन ऑडिटसाठी नकार दिला होता. ऑडिट झाल्यास पर्दाफाश होणार असल्याचे केजरीवालांना माहित होते. 18 क्रायोजेनिक टँकर थायलंडमधून मागविणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते. आतापर्यंत किती टँकर आले असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मोहल्ला नव्हे हो हल्ला क्लीनिक

भाजप नेत्याने मोहल्ला क्लीनिकवरही निशाणा साधला आहे. मोहल्ला क्लीनिकप्रकरणी जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका कौतुक करत असल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला होता. पण कोरोनाची दुसरी लाट आल्यावर मोहल्ला क्लीनिक ठप्प पडल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे.

Related Stories

लोकसभा सभापती ओम बिर्लांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

देशात तीन नवीन राफेल विमाने दाखल

Amit Kulkarni

इतिहास लेखनात अनेकांवर अन्याय

Patil_p

कोरोनाचा कहर : आता केरळमध्येही लॉकडाऊन!

Rohan_P

काश्मिरी विस्थापितांना परत मिळणार वडिलोपार्जित संपत्ती

Patil_p

लष्कर-ए-मुस्तफा दहशतवादी संघटनेचा प्रमुख जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!