तरुण भारत

न्यूयॉर्कमध्ये ‘रँकिंग’ प्रणालीने होणार महापौराची निवड

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच महापौराच्या निवडणुकीसाठी रँकिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यात मतदारांना कुठल्याही एका उमेदवाराला निवडण्याची अनिवार्यता नसेल. मतदार पसंतीच्या आधारावर 5 उमेदवारांना प्राधान्यक्रमात ठेवू शकतील. ही रँकिंग प्रणाली अंतिम उमेदवाराच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. मतदार सर्व उमेदवारांना फेटाळण्याची स्थितीही निर्माण होऊ शकते.

Advertisements

कुठल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांचे बहुमत न मिळाल्यास निर्णय तत्काळ रनऑफने होणार आहे. रनऑफचा अर्थ सर्वात कमी प्रथम पसंतीचे मानांकन मिळालेल्या उमेदवाराला हटविण्यात येईल. त्याची मते संबंधित मतदारांच्या दुसऱया पसंतीच्या मानांकनात सामील केले जातील. एक उमेदवार उर्वरित मतांमध्ये बहुमत प्राप्त करेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

ही व्यवस्था जटिल असून मतदारांना अधिक निर्णय घेण्यास भाग पाडणारी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यातून अनेक मतदार अधिक उमेदवारांचे मानांकन करू शकणार नाहीत. मतदारांनी 5 पसंतीच्या उमेदवारांचे रँकिंग केले असते तर निकाल वेगळा लागला असता अशी शक्यताही राहणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. अमेरिकेच्या 8 प्रांतांमधील अनेक शहरांमध्ये रँकिंग प्रणाली लागू आहे.

Related Stories

लॉकडाउन विरोधात आक्रोश, ऑस्ट्रियात निदर्शने

Patil_p

संयुक्त राष्ट्राच्या गाडीत सेक्स, व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला 4 लाखांचा आकडा

datta jadhav

टीव्ही आणि खाणे

Patil_p

पाकिस्तान : रावळपिंडीत 100 वर्ष जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

datta jadhav

भारतात होणार ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन

datta jadhav
error: Content is protected !!