तरुण भारत

‘डिस्चार्ज’मध्ये वाढ, सक्रिय रुग्णांमध्ये घट

चोवीस तासात 2.11 लाख जणांची कोरोनावर मात : देशात 1.34 लाख नवे बाधित : दिवसभरात 2,887 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असली तरी कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. देशात सध्या दररोज सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात 1 लाख 34 हजार 154 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून 2,887 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज देशात सलग 21 व्या दिवशी कोरोनाची बाधा झालेल्यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 3 लाख 37 हजार 989 जणांचा बळी गेला आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.18 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन रुग्णसंख्या 7 टक्क्मयांनी कमी झाली आहे. अजूनही देशात 17 लाख 13 हजार 413 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या यादीत भारत जगभरात दुसऱया स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येतही भारत जगात दुसऱया स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. भारतात आतापर्यंत तब्बल 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

चाचण्यांचा वेगही वाढला देशात बुधवारपर्यंत 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. अखेरच्या एका दिवसात 24 लाख 26 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 35 कोटी 37 हून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात 21.59 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

Related Stories

‘आत्मनिर्भर भारत’ जगालाही सावरणार!

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य नाही

Patil_p

#MamataBanerjee: प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरणार? ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

Abhijeet Shinde

भारत सरकारकडून चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय

Rohan_P

Tokyo 2020 : भारतीय महिला संघाची उपांत्यफेरीत धडक

Abhijeet Shinde

दिल्लीत 150 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!