तरुण भारत

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 15,229 नवे रुग्ण; 307 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासात 15 हजार 229 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 25, 617 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 307 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. 

Advertisements


राज्यात आजपर्यंत एकूण 54 लाख 86 हजार 206 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.68 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,57,74,626 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,91,413 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 15,66,490 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 2 लाख 04 हजार 974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • मुंबई : 16,612 रुग्णांवर उपचार सुरू 


मुंबईत मागील 24 तासात 961 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 897 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,08,968 वर पोहचली असून त्यातील 6,75,193 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 14,965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अलमट्टी बाबत उद्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – जयंत पाटील

Abhijeet Shinde

जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच, आज आणखी 8 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

एअरटेल सीमकार्ड बंद पडण्याचे वाढले प्रमाण

Amit Kulkarni

पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कोल्हापूर : वारणा नदीला पूर, आमदार राजूबाबा आवळेंनी केली खोचीतील पूरस्थितीची पाहणी

Abhijeet Shinde

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

Patil_p
error: Content is protected !!