तरुण भारत

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला.

केंद्र सरकारने मंगळवारी देशभरातील सीबीएसई १२ वी च्या बोर्ड परीक्षा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. आता कर्नाटकानेही पीयूसी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान कर्नाटक सरकारनेही परीक्षा रद्द कराव्यात यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून दबाव टाकला जात होता. विद्यार्थी आणि पालकांनी सरकारने कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली होती.

Advertisements

Related Stories

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; पाकच्या टीव्ही चॅनेलच्या वृत्ताने खळबळ

datta jadhav

राज्यातील घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

इन्फोसिसच्या 80 हजार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉर्म होम

datta jadhav

रुग्णवाहिका सेवेचा होणार कायापालट

Patil_p

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सीबीआयचा छापा : काँग्रेस

triratna

लॉकडाउनमध्ये 39 पत्नींना सांभाळण्याचे दिव्य

Patil_p
error: Content is protected !!