तरुण भारत

थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन

खानापूर तालुका युवा समितीचा इशारा :  लैला शुगरच्या अधिकाऱयांना निवेदन, 15 दिवसांची दिली मुदत

वार्ताहर / नंदगड

Advertisements

गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱयांची ऊसबिले 15 दिवसांत देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्ससमोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देऊन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱयांसमोर शेतकऱयांना येणाऱया अडचणींचा पाढा वाचला तसेच 15 दिवसांत शेतकऱयांची थकीत बिले देण्याची मागणी केली तसेच याबाबतचे निवेदन देण्यात
आले

यावेळी ज्या शेतकऱयांनी ऊस पुरवठा केला त्या शेतकऱयांची उसाच्या बिलांची 15 जानेवारी 2021 रोजी पूर्ततः करण्यात आली आहे. पण त्यानंतर ज्या शेतकऱयांनी  कारखान्याला ऊस पुरविला त्यांचे बिल थकीत असल्याने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱयांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे याची दखल घेऊन उर्वरित ऊस बिल लवकरात लवकर शेतकऱयांच्या बँक खात्यात 15 दिवसांच्या आत जमा करावे  अन्यथा युवा समितीतर्फे शेतकरी बांधवांसोबत कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरू करण्यात येईल. याची कारखाना प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली. यावेळी उपस्थित खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील, राजू कुंभार, विनायक सावंत, किशोर हेब्बाळ्कर, भुपाल पाटील, परशराम गोरे, अनंत झुंजवाडकर, राहुल पाटील, ज्ञानेश्वर सनदी आदी कार्यकर्ते उपस्थित
होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी लॉकडाऊनमुळे साखर नेण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे शेतकऱयांची बिले देण्यास अडचण निर्माण झाली असून शेतकऱयांना लवकरात लवकर बिले मिळावी यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच पुढील वर्षापासून शेतकऱयांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र पंधरा दिवसात बिले न दिल्यास आंदोलन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला
आहे.

Related Stories

परराज्यांतून ग्रामीण भागात येणाऱयांची संख्या वाढली

Patil_p

टिळकवाडीतील बच्चा क्लब लायब्ररी ठरतेय उपयुक्त

Patil_p

गांधीनगरजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त

Patil_p

बेकायदेशीर वाहतूक, कोटीची रक्कम जप्त

Patil_p

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित

Patil_p

कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी देवीचा वाढदिवस साधेपणाने

Patil_p
error: Content is protected !!