तरुण भारत

1 जुलैपासून शाळा होणार सुरू

15 जूनपासून प्रवेश प्रक्रिया : शिक्षण खात्याकडून आदेश जारी

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

2021-22 हे नवे शैक्षणिक वर्ष 1 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक-माध्यमिक शाळा 1 जुलैपासून सुरू होणार असल्याचा आदेश सार्वजनिक शिक्षण खात्याने अधिकृत पत्रकाद्वारे दिला आहे. दरम्यान, 15 जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार असून ती 31 जूनपर्यंत पूर्ण करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी यापूर्वी 15 जूनपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शिक्षण खात्याने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशपत्रकामध्ये 14 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतरही कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्याची शक्यता कमी असल्याने 1 जुलैपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, हे वेळापत्रक तात्पुरते असून परिस्थितीनुरुप त्यात बदलही होऊ शकतो, असे खात्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यामध्ये शाळा भरणारे आणि सुटय़ांचे दिवस असे वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिले सेमिस्टर 1 जुलैपासून ते 9 ऑक्टोबर 2021 पर्यंत असणार आहे. त्यानंतर 11 दिवसांची म्हणजेच 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दसरा सुटी असेल. दुसरे सेमिस्टर 21 ऑक्टोबर 2021 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. त्यानंतर 28 दिवसांची उन्हाळी सुटी असणार आहे. एकंदर शैक्षणिक वर्षात 238 दिवस शाळा भरणार आहे. तर रविवारसह सण, जयंती व इतर कारणांमुळे 66 दिवस सरकारी सुटी असेल. शाळांना 4 दिवसांच्या राखीव (स्थानिक) सुटय़ा देण्यात आल्या आहेत. संप, आंदोलनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्यास सुटय़ांच्या दिवशी हे दिवस भरून काढण्याची सूचनाही आदेशपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

…तर अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब

कोरोना परिस्थितीमुळे जर शाळांमध्ये वर्ग भरविणे (ऑफलाईन क्लास) शक्य न झाल्यास ऑनलाईन, दूरदर्शन, क्लास व इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. या शिक्षणपद्धतीद्वारे अध्ययन आणि मूल्यमापन प्रक्रिया सुरू ठेवावी. याबाबत शिक्षण खात्याकडून स्वतंत्र मार्गसूची जारी केली जाणार आहे.

Related Stories

माझ्या राजीनाम्याने म्हैसूर कोरोनामुक्त होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार: मंत्री सोमशेखर

Abhijeet Shinde

येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही : पर्यंटन मंत्री

Abhijeet Shinde

अन्मेस्टी इंटरनॅशनलची बेंगळूरमधील मालमत्ता जप्त

Amit Kulkarni

उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील आठ सदस्य पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कर्नाटकात गेल्या २४ तासात २ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कर्नाटकात १.१६ लाख कोटींची गुंतवणूक करणार : मंत्री गडकरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!