तरुण भारत

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांजवळ

नवे 880 ः कोरोनामुक्त 1241 ः मृत्यू  23 ः मनपाक्षेत्रात 99 तर ग्रामीण भागात 781

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या आता चांगलीच उतरू लागली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दहा टक्क्यांजवळ आला आहे. हा जिल्ह्यासाठी फार मोठा दिलासा आहे. शुक्रवारी 880 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूदर मात्र अद्यापही कमी झालेला नाही.शुक्रवारी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 99 तर ग्रामीण भागात 781 रूग्ण वाढले आहेत. उपचारात 10 हजार 545 रूग्ण आहेत

23 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 23 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात सांगलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. कडेगाव, कवठेमहांकाळ 1, खानापूर, वाळवा 4, पलूस, जत, शिराळा 2, तासगाव, मिरज 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

1241 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे एक हजार 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एक लाख 22 हजार 162 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख आठ हजार 87 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

नवे रूग्ण    880

उपचारात    10545

बरे झालेले   108087

एकूण      122162

मृत्यू        3530

शुक्रवारचे बाधित रूग्ण

तालुका       रूग्ण  

आटपाडी      34

कडेगाव       54

खानापूर      60

पलूस        50

तासगाव      67

जत         85

कवठेमहांकाळ  70

मिरज        102

शिराळा       107

वाळवा        152

सांगली शहर    79

मिरज शहर      20

एकूण       880

आजचे लसीकरण   10269

एकूण लसीकरण   716434

कोरोना चाचणी –  8159

Related Stories

आटपाडी तालुक्यात विजेचा धक्का लागून शिक्षकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : भाजपाने सत्ता असताना आवश्यक ती पुर्तता केली असती तर आज ही परस्थिती नसती : आ. अरुण लाड

Abhijeet Shinde

जलसमाधी आंदोलन : स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या नदीत उड्या

Abhijeet Shinde

मिरज गणेश तलावात पडून एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मंदिरे खुली झाल्याने, शिराळकर अंबाबाईच्या दर्शनाला

Abhijeet Shinde

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!