तरुण भारत

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा गळ्यावर वार करून खून

बांदा / प्रतिनिधी-

बांदा – गडगेवाडी येथे सेंट्रिगचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना बांदा येथे घडली. विश्वजित कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे या कामगारांचे नाव आहे. विश्वजित हा बाहेरच्या खोलीत झोपला होता तर पत्नी, मुलगी व मुलगा आतील खोलीत झोपले होते. दररोजप्रमाणे दरवाजा उघडत नसल्याने मुलांनी हाका दिली. यावेळी दरवाजा उघडण्यासाठी गेलेल्या ग्रा प सदस्य मकरंद तोरसकर कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यावेळी हि बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

Advertisements

Related Stories

पहिला डोस घेणाऱयांची संख्या 1.45 लाख

NIKHIL_N

वैभववाडीत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला

NIKHIL_N

पहिल्या दिवशी केवळ 226 प्रवासी

NIKHIL_N

सावंतवाडी पालिका बनली रिकामटेकडय़ांचा अड्डा

NIKHIL_N

पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार देसाई

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : वेरळच्या ‘त्या’ ७० मतिमंद विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!