तरुण भारत

सेरेना विल्यम्स, अझारेंका चौथ्या फेरीत

फ़्रेंच  टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा

पॅरिस / वृत्तसंस्था

Advertisements

ऍश्ले बार्टी व नाओमी ओसाका यंदाच्या प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्यानंतर आर्यना सॅबालेंका ही सर्वोच्च मानांकित महिला टेनिसपटू स्पर्धेत आव्हान कायम राखून होती. मात्र, शनिवारी तिसऱया फेरीतील लढतीत तिला ऍनास्तासिया पॅव्हल्युचेंकोव्हाकडून 4-6, 6-2, 0-6 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने मात्र आपली आगेकूच कायम राखत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने राष्ट्रीय सहकारी डॅनिएले कॉलिन्सला 6-4, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभूत केले.

तिसऱया मानांकित सॅबालेंकाने येथे सहज विजय प्राप्त करणे अपेक्षित होते. पण, ऍनास्तासियाने तिला जबरदस्त धक्का दिला. सॅबालेंका स्पर्धेतून बाहेर फेकली गेल्यानंतर यंदाच्या पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीतील पहिल्या तीन अव्वलमानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले.

सॅबालेंकाने वास्तविक पहिल्या सेटमध्ये 3-0 अशी एकतर्फी आघाडी घेत दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पॅव्हल्युचेंकोव्हाने पुढील सलग 7 गेम जिंकत वर्चस्व गाजवणे सुरु केले. पॅव्हल्युचेंकोव्हाला वेदना होत असल्याने खेळाच्या मध्येच वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, त्यानंतर पुन्हा जोमाने खेळ साकारत तिने विजयावर शिक्कामोर्तब केले. पुढील फेरीत तिची लढत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाविरुद्ध होईल.

सेरेनाची आगेकूच

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपलीच राष्ट्रीय सहकारी कॉलिन्सला सरळ सेटसमध्ये पराभूत करत चौथ्या फेरीतील स्थान निश्चित केले. 39 वर्षांच्या सेरेनाने संयमी मात्र तडफदार खेळावर भर देत वर्चस्व प्रस्थापित केले. मानांकनात सातव्या स्थानी असणारी सेरेना या स्पर्धेत आव्हान बाकी असलेली अव्वल खेळाडू ठरली आहे.

यंदा 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या या अनुभवी टेनिसपटूची उपांत्यपूर्व फेरीतील लढत कझाकस्तानच्या 21 व्या मानांकित एलेना रिबॅकिना हिच्याविरुद्ध होईल. सेरेनाविरुद्ध कॉलिन्सने काही वेळा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, ती यात फारसे यश मिळवू शकली नाही.

अझारेंकाची घोडदौडही कायम

बेलारुसची माजी अव्वलमानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने 8 वर्षांनंतर प्रथमच चौथी फेरी गाठली. तिने अमेरिकेच्या मॅडिसन कीजवर 6-2, 6-2 अशा सरळ फरकाने मात दिली. 8 वर्षांपूर्वी अझारेंका रोलँड गॅरोसवर उपांत्य फेरीत पोहोचली होती आणि या स्पर्धेतील ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली. मागील महिन्यात माद्रिद स्पर्धेतून माघार घेतलेली असल्याने येथे प्रेंच ओपनमध्ये ती खेळणार का, याबद्दल साशंकता होती. पण, पाठदुखीवर वेळेत मात करणे शक्य झाल्यानंतर ती या स्पर्धेत ताज्या दमाने उतरली आहे.

मेदव्हेदेव्हच सहज विजय

पुरुष एकेरीत रशियाच्या द्वितीय मानांकित डॅनिएल मेदव्हेदेव्हने 32 व्या मानांकित ओपेल्काला 6-4, 6-2, 6-4 अशा फरकाने पराभूत करत स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. मेदव्हेदेव्हने यापूर्वी 4 वर्षात क्ले कोर्ट ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकही विजय संपादन केलेला नाही. यंदा मात्र त्याने विजयात सातत्य राखत त्याने चौथ्या फेरीपर्यंत आगेकूच केली आहे. पुढील फेरीत त्याची लढत 22 व्या मानांकित ख्रिस्तियन गॅरिनविरुद्ध होणार आहे.

अन्य लढतीत स्टेफानोस त्सित्सिपासने 31 व्या मानांकित जॉन इस्नेरला 5-7, 6-3, 7-6 (3), 6-1 अशा फरकाने मात दिली. पावसाचा व्यत्यय आल्याने ब्रेक घ्यावा लागल्यानंतर यांचा लाभ घेत फेरेरिको डेल्बोनिसने फॅबिओ फोग्नीनीला 6-4, 6-1, 6-3 अशी मात दिली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत अलेजांड्रो ड्रव्हिडोव्हिचने 15 व्या मानांकित कॅस्पर रूडला 7-6 (3), 2-6, 7-6 (6), 0-6, 7-5 अशा सेटसमध्ये मात दिली. ही लढत तब्बल 4 तास 35 मिनिटे चालली होती. केई निशिकोरीला हेन्री लॅक्सोनेनने माघार घेतल्याने पुढे चाल मिळाली. त्याची पुढील लढत सहाव्या मानांकित अलेक्झांडर झेरेव्हविरुद्ध होईल.

Related Stories

विराटची पहिली ऑडी पोलीस स्टेशनमध्ये का?

Patil_p

एजबॅस्टन स्टेडियमवर कोव्हिड-19 एनएचएस स्टाफसाठी चाचणी केंद्र

Patil_p

भारत-इंग्लंडचे सर्व खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p

मेस्सी बार्सिलोनाच्या सरावात दाखल

Patil_p

टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी

Patil_p

मेदव्हेदेव्हची चौथ्या फेरीत धडक

Patil_p
error: Content is protected !!