तरुण भारत

मांडवे येथे पुन्हा ढगफुटी

पुरात वाहून गेल्याने वृद्धेचा मृत्यू

प्रतिनिधी/ नागठाणे

Advertisements

शनिवारी सायंकाळी नागठाणे परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मांडवे (ता.सातारा) येथे पुन्हा एकदा ढगफुटी होऊन ओढय़ा-नाल्याना पूर आला. या पुरात गावातील वृद्ध महिला वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मधुमती सुधाकर माने (वय.65,रा.मांडवे,ता.सातारा) असे पुरात वाहून गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नागठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी नागठाणे गावच्या पश्चिमेस डोंगर पायथ्याला असलेल्या मांडवे गावात पुन्हा एकदा ढगफुटी झाली. येथे सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने शिवारातील ओढय़ाना पूर आला. या मुसळधार पावसात माकडजाई पायथा येथे असलेल्या शिवारातून पुतळाबाई माने या वृद्धा घराकडे निघाल्या होत्या. वाटेत असलेला ओढा ओलांडत असताना अचानक पुराचे पाणी आल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावानजीक ओढय़ाच्या पात्रातील झुडुपात अडकलेल्या स्थितीत तासाभराने सापडला. मधुमती माने या माजी सरपंच राजेंद्र माने यांच्या मातोश्री होत्या.

     ओढय़ाच्या पुराचे पाणी ओढय़ालगतच्या असलेल्या विहिरीतही आल्याने विहिरी भरल्या गेल्या. तर काही घरांमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले.  मधुमती माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी कर्मचाऱयांसह तात्काळ मांडवे गावाकडे धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत नागठाणे परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता.

Related Stories

कोयना नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे : पालकमंत्री

Abhijeet Shinde

भारतीयांच्या आयुष्यात कोरोनामुळे दोन वर्षांनी घट

Abhijeet Shinde

अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

datta jadhav

अनुदान द्या अन्यथा तीव्र आंदोलन…

Abhijeet Shinde

सोलापूर : जमत असेल तर काम करा, अन्यथा सोडून द्या – जिल्हा आरोग्य अधिकारी

Abhijeet Shinde

जिल्ह्यात आणखी १७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर; सायंकाळपर्यंत सापडले एकूण ४७ पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!