तरुण भारत

लॉकडाऊन काढण्याची सातारा प्रशासनाची मानसिकता पण हवी

● अस्तित्वात नसलेला युवक बाधित कसा? ● सुट्टी रद्द करुन टेस्टिंग वाढवा ● आता ऑक्सिजन बेड का वाढेनात? ● बाकी बंद तर सरकारी पगार निम्मे करा

दीपक प्रभावळकर / सातारा :

Advertisements

प्रशासनाच्या सूचना पाळून 33 लाख लोकसंख्या असलेला जिल्हा कडेकोट बंद आहे. प्रत्येक चुका जनतेच्या माथी मारुन चालणार नाही. आकडा वाढला की जनतेमुळे आणि कमी झाला की प्रशासनामुळे ही मुजोरी बंद व्हायला हवी. प्रशासनानेसुद्धा येत्या तीन दिवसात लॉकडाऊन काढण्याची मानसिकता दाखवायला हवी. रविवारची सुट्टी रद्द करुन टेस्टिंगचा खरा आकडा दहा हजारांच्या पुढे न्यायला हवा. अचानक ऑक्सिजन बेड वाढवणे बंद झाले आहे. ते तातडीने वाढवा. तरच लॉकडाऊन हटेल. संपूर्ण जिल्हा सलगपणे लॉकडाऊन ठेवल्यामुळे सामान्यांचा रोजगार, व्यवसाय, उद्योग पूर्णतः बंद आहे. तर शासकीय पगारसुद्धा निम्यावर आणा या मागणीला सुद्धा ठळकता देण्याची वेळ आली आहे.  

सातारा जिल्हय़ात कोरोना आकडे अपलोड न झाल्यामुळे गेंधळ उडाला. शनिवारपर्यंत तो सावरण्यात आल्याचे चित्र आहे. कारण शनिवारी टेस्टिंगचा आकडा 9,607 आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पॉझिटीव्हीटीचा फुगवटा जाणवल्यानेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.  मात्र 1 ते 5 जून एकुण 44 हजार 605 चाचण्या होवून 5 हजार 685 लोक बाधित झाले म्हणजेच पॉझिटीव्हीटी रेट 12.74 टक्के इतका आता खाली आला आहे.  

महाराष्ट्र सरकारने पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांवर लॉकडाऊन ठरवला आहे. त्यामुळे यावरच जिल्हा प्रशासनाने काम करण्याची गरज आहे.  

आणखी एक पुरावा घ्या, अस्तित्वात नसलेला युवक बाधित

आरे-कारी नंतर अनेक पुरावे समोर येत आहेत. त्यात आणखी विचित्र, संतापजनक प्रकरण ‘तरुण भारत’च्या हाती आले. आता याची चौकशी करण्यासाठी पुन्हा एक नवी समिती स्थापन केली जाईल. वास्तविक चुका मान्य करा आणि यापुढे ‘अचूक’ काम करा, अशीच साऱयांची मागणी आहे.  हे प्रकरण असे आहे की, दि. 21 एप्रिल 2021 रोजी कोरेगाव तालुक्याच्या अहवालात 203 बाधित आढळले. या यादीत 136 क्रमांकावर 30 वर्षीय युवक सौरभ रत्नपारखी हा युवक बाधित आला. त्याचा आयसीएमआर नं. 25,49,27,26,0 हा आहे. गम्मत म्हणजे याच यादीत 135 व्या क्रमांकावर ‘सुरेश रत्नपारखी वय 30, पुरुष, तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्र, रा. कोरेगाव’ हा युवक बाधित दाखवण्यात आला आहे. वास्तविक सुरेश रत्नपारखी नावाचा व्यक्तीच कोरेगावात अस्तित्वात नाही. रत्नपारखी कुटुंबात कोणाचेही नाव सुरेश नाही.  आणखी एक गम्मत म्हणजे या दोन्ही क्रमांकावर 7550609979 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. सुरेशचा नंबर असणे शक्यच नाही. तर हा खऱया खुऱया सौरभचाही नाही. सौरभचा मोबाईल क्रमांक 7350007979 असा आहे. म्हणजे दोन्ही क्रमांकात केवळ 0 चे 6 आणि 7 ते 9 इतकेच बदल करुन आकडे अपलोड झाले आहेत. यात केवळ मोबाईल क्रमांक बदलला नाही तर आकारण जिल्हय़ाची पॉझिटीव्हीटी वाढली व अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचा स्वॅब आणून त्य़ाला बाधित करण्याची किमया साताऱयात घडवता आली.

रविवारी सुट्टय़ा रद्द करुन टेस्टिंग करा

पॉझिटीव्हीटी रेट खाली आला असला तरी शनिवार ते सोमवार रॅट टेस्ट फोर्सफुल्ली करुन घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षभराचा अंदाज घेता प्रत्येक शनिवार-रविवारी टेस्टिंगचे आकडे कमी असतात. याही वेळेला तसेच घडले तर पॉझिटीव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या आत येणे अवघड होईल. आणि लोक बेजबाबदार आहेत, बंधने पाळत नाहीत, अशी कारणे देत कागदावरचा आकडा दाखवून प्रशासन लॉकडाऊनची कुऱहाड चालवेल.  टेस्टिंग वाढवणे लोकांच्या हातात नाही. शनिवारी   1 हजार 394 बाधित आले आहेत. तर निकटसहवासित टेस करुन टेस्टिंग वाढवणे प्रशासनाच्याच हातात आहे. मात्र इतक्या बारकाईने विचार करुन सातारा जिल्हय़ातील लॉकडाऊन उठवणे किंवा शिथील करुन सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱयाची मानसिकता असायला हवी.  

आणखी एक पुरावा…मी यादीत कधी येणार?

‘आरे-कारी’ प्रकरणाचा शोध सुरु असला तरी प्रकरण अद्याप संपले नाही. एकेकाळी हॉटस्पॉट बनलेल्या आरेतील अनिकेत किर्ते हा युवक दि. 27 एप्रिलला सातारच्या नामांकित लॅबमध्ये बाधित आल्याचे त्याला सांगण्यात आले. परंतु संबंधित लॅबने हा अहवाल अद्याप दिलेला नाही. अनिकेतला  दि. 3 मे रोजी प्रांत कार्यालयाने फोन केल्यावर त्याने हकीकत सांगितली. पाच मिनिटानंतर पुन्हा फोन करणारे प्रांत कार्यालय आता त्याचाच फोन उचलेना झालंय.लॉकडाऊन हटवण्यासाठी हे करावे लागेल?

प्रत्येक सातारकराला लॉकडाऊन शिथील होण्याची प्रतिक्षा आहे. त्यासाठी आम्ही काय करु असा सामान्य जनतेचा प्रश्न असला तरी ते काहीच करु शकत नाहीत. जे काही करायचेच ते प्रशासनाला. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, बाधितांच्या 20 पट टेसिंग करुन टेस्टिंग करणे यावर जोर दिला तर कागदावरचे आकडे राज्य शासनाच्या निकषात येतील. मशागतीचा आख्खा हंगाम वाया गेला. शेवटचे चार दिवस तरी कारणी लागू देत, अशी शेतकऱयांची हाक आहे.

-दीपक प्रभावळकर, सातारा 9325403232, 9527403232

Related Stories

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भाजपा जिल्हापदाधिकाऱ्यांचा सत्कार

Abhijeet Shinde

कर्नाटकात येताना केरळमधील नागरिकांकडे कोरोना नकारात्मक अहवाल असणे आवश्यक

Abhijeet Shinde

मराठा नेत्यांची बैठक घेणार

Patil_p

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Rohan_P

कास रोडवर धनदांडग्यांची अनधिकृत बांधकामे जोमात प्रशासन मात्र कोमात

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानाना पाठवले पत्र

Patil_p
error: Content is protected !!