तरुण भारत

मराठा आरक्षण: १६ जूनपासून राज्यात आंदोलन : खासदार संभाजीराजे

पुणे/प्रतिनिधी

मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर ६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे रायगडावरून काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर करत १६ जूनपासून राज्यात आंदोलनाची हाक दिली. दरम्यान या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली.

यावेळी त्यांनी या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा इशाराही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

Advertisements

Related Stories

वाहतूक शाखेचा कारभार गोंडसेंच्या खांद्यावर

Patil_p

देशात 48,648 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

अवैध अर्ज झाला वैध

Patil_p

‘मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही’

Patil_p

वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

Patil_p

Flood situation : आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी-देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!