तरुण भारत

लांजा-कणगवलीत बेपत्ता प्रौढाचा घातपात?

प्रतिनिधी/ लांजा

तालुक्यातील कणगवली पेनेवाडी येथील बेपत्ता सीताराम सोमा सुवारे (वय 56, (रा. पेनेवाडी-कणगवली) यांचा शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुजलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेहामुळे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

  2 जून रोजी सीताराम सोमा सुवारे (रा. पेनेवाडी-कणगवली) हे बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली होती. आपली दुचाकी घेऊन सीताराम सुवारे हे सकाळी 7 वाजता कामानिमित्त घरातून बाहेर जात आहे, असे सांगून निघाले होते. यानंतर 5 जून रोजी सायंकाळी बेपत्ता सीताराम सुवारे यांची दुचाकी गाडी वेरळ-कणगवली रोडवर जाधव यांच्या बागेजवळ आढळली. गाडी आढळलेल्या ठिकाणापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या दगडी गडग्याजवळ कुजलेल्या स्थितीत सुवारे यांचा मृतदेह निदर्शनास आला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. संशयास्पद स्थितीत हा मृतदेह आढळल्याने घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Related Stories

कोकण मार्गावर विलंबाने धावणार १६ रेल्वेगाड्या

Patil_p

जिह्यात कोरोनाचे 16 नवे रुग्ण

Patil_p

रत्नागिरी शहरात समावेशासाठी काही ग्रामपंचायतींचा होकार

Patil_p

पॅरोलवर सुटलेले दोघे अलगीकरण कक्षात

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 7 हजाराचा टप्पा

Patil_p

कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

NIKHIL_N
error: Content is protected !!