तरुण भारत

कोरोना : 403 बाधित, 16 बळी

बरे होण्याचे प्रमाण 93.78 टक्के

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्यात कोरोनामुळे रविवारी 17 जणांचे बळी गेले तर 403 बाधित सापडले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 93.78 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सध्या 7154 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

गत 24 तासात बरे झालेल्या 1449 रुग्णांसह एकूण 149479 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बाधितसंख्या 159393 वर पोहोचली आहे. रविवारी   3022 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 403 बाधित सापडले. त्यापैकी 73 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 330 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

रविवारी बळी गेलेल्या 16 जणांसह एकूण बळींची संख्या 2760 वर पोहोचली आहे. या 16 जणांपैकी 10 जण गोमेकॉत व 5 जण दक्षिण जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय दक्षिण गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 28 पासून 71 वर्षे वयोगटातील 9 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे. या बळींपैकी दोघांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

कासारवर्णेत सर्वात कमी रुग्ण

राज्यातील 33 कोरोना उपचार केंद्रांपैकी अनेक ठिकाणी रुग्णसंख्या तेजीने घटत आहे. सर्वाधिक रुग्ण असणाऱया मडगाव केंद्रातही आता अवघेच म्हणजे 580 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या सर्वाधिक 590 रुग्ण फोंडा केंद्रात तर सर्वात कमी 55 रुग्ण कासारवर्णेत आहेत. हळदोणे, मये व कासारवर्णेतील रुग्णसंख्या दोन अंकी संख्येवर आली आहे.

Related Stories

राज्यातील काजू उत्पादनाचा दर प्रति किलो 11 रुपयाना घसरला

Amit Kulkarni

फर्मागुडी-ढवळी बायपास रोडवर व्हेगनआर कलंडली

Omkar B

कडधान्याचे 374 ट्रक गोव्यात दाखल : मुख्यमंत्री

Patil_p

‘संजीवनी’संबंधी कुठलाही निर्णय शेतकऱयांना विश्वासात घेऊनच !

Patil_p

साखळी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विजयीकरण्याचा निर्धार : पत्रकार परिषदेत माहिती

Amit Kulkarni

मडगाव श्री हरि मंदिर देवस्थानच्या ‘दिंडी’ उत्सवाला प्रारंभ

Omkar B
error: Content is protected !!