तरुण भारत

जीसीईटी परीक्षा आता 27, 28 जुलै रोजी

कोरोना महामारीचे संकट सुरुच असल्याने निर्णय

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून ती आता 27 व 28 जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी या परीक्षेच्या तारखा 15 व 16 जून रोजी निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोना महामारीचे संकट चालू असल्याने त्या तारखा स्थगित करुन पुढे नेण्यात आल्या आहेत. आता जीसीईटी परीक्षा 27 व 28 जुलै रोजी निश्चित करण्यात आली असून त्याची प्रक्रिया सुमारे महिनाभर तरी आधी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंजिनियरींग – फार्मसी प्रवेशासाठी सदर जीसीईटी परीक्षा घेण्यात येते आणि दरवर्षी त्या परीक्षेला साधारण 3000 च्या आसपास विद्यार्थी बसतात. येत्या 20 जूनपासून जीसीईटी परीक्षा प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. वास्तविक मे महिन्यातच ही परीक्षा घेण्यात येते परंतु यंदा एप्रिल – मे दोन्ही महिने कोरोनाच्या संकटात गेले. त्यामुळे दहावी – बारावी परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून जीसीईटी परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता जीसीईटी परीक्षेच्या निकालापूर्वी बारावी परीक्षेचा निकाल लागणे आवश्यक आहे. बारावी निकाल अंतर्गत मुल्यमापनाने लावता येईल पण जीसीईटी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी प्रत्यक्ष लेखी परीक्षा घ्यावीच लागणार आहे. ती टाळता येणार नाही.

Related Stories

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

Amit Kulkarni

इनडोअर स्टेडियम्स 12 जुलैनंतर सुरू होण्याची क्रीडा सचिवांची ग्वाही

Amit Kulkarni

कोविड रुग्णांस सर्व सुविधा मोफत देणारे गोवा एकमेव राज्य

Amit Kulkarni

मडगावातील 450 परप्रांतीय मजुरांची नावेली इनडोअर स्टेडियममध्ये सोय

Patil_p

मडगावातील सुलभ शौचालयाला सुक्या कचऱयाचा विळखा

Patil_p

गोव्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी

Rohan_P
error: Content is protected !!