तरुण भारत

शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

मोजक्मया कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ व शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगावच्यावतीने 348 वा शिवराज्याभिषेक (शिवस्वराज्य) दिन साजरा करण्यात आला.

Advertisements

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने सुनील जाधव यांनी जाहीर केला. त्यानुसार निवडक कार्यकर्त्यांसह रविवारी सकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मराठा परिषदेचे अध्यक्ष व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी उद्यानातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर विविध रंगांचा जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी श्रीफळ वाढविले. आदित्य पाटील व प्रमोद कंग्राळकर यांनी शिवरायांची आरती, ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटला.

यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, संजय नाईक, रवी निर्मळकर, प्रल्हाद गावडे, विनायक शेट्टी, पवन रायकर, प्रसाद चिकोर्डे, अजय सुगने, उमेश ताशिलदार, रोहित मोरे, मारुती पाटील व शिवभक्त उपस्थित होते.

कपिलेश्वर रोड रामा मेस्त्री अड्डा

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री बालशिवाजी युवक मंडळ कपिलेश्वर रोड रामा मेस्त्री अड्डा यांच्यावतीने शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नैवेद्य म्हणून दाखविण्यात आलेला पुलाव आणि शिरा गरजू नागरिकांना वितरित करण्यात आला.

 सदर मंडळाच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात रात्रीच्या वेळी गरजूंना अन्नाचे वाटप करण्यात येत आहे. सदर मंडळाचा उपक्रम गेल्या 21 दिवसांपासून सुरू असून गल्लीतील कार्यकर्ते या कामात हातभार लावत आहेत.

Related Stories

संतिबस्तवाड येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B

शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे उल्लेखनीय कार्य

Amit Kulkarni

बेळगावात नव्या नियमाची अंमलबजावणी

Patil_p

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातात वाढ

Amit Kulkarni

पहिलाच विकेंड अंधारात

Amit Kulkarni

ताणतणाव, कौटुंबिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन

Patil_p
error: Content is protected !!