तरुण भारत

जम्मू काश्मीर : बस स्टँडवर ग्रेनेड स्फोट, 7 जखमी

प्रतिनिधी / श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील त्राल मुख्य बसस्थानकावर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात 7 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांनी हा हल्ला ग्रेनेडने केला आहे. यामध्ये ग्रेनेडचा हवेतच स्फोट घडवून आणला आहे. मात्र झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. या हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हा परिसर रिकामा केला असून शोध सुरू आहे. त्रालच्या बस स्थानकानजीक ग्रेनेडची पिन सापडली असल्याने हा स्फोट ग्रेनेडमुळे झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

Advertisements

Related Stories

नवाज शरीफ भारताचे एजंट : शेख रशीद

datta jadhav

तडीपार गुन्हेगाराचा युवकावर चाकू हल्ला

Amit Kulkarni

वड्डी गावच्या 15 एकर शेतात शिरले ड्रेनेजचे पाणी

Abhijeet Shinde

आमदार पडळकरांनी मारले मैदान; अखेर गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत संपन्न

Abhijeet Shinde

दहावी परीक्षेचा निकाल 99.9 टक्के

Patil_p

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!