तरुण भारत

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

सांगली \ ऑनलाईन टीम

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या १०८ वर्षीय जरीना आजी यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. ट्वीट करत जयंत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे तसेच काही फोटो देखील शेअर करत लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आमच्या इस्लामपूर शहरातील १०८ वर्षीय जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे.

लसीकरणात महाराष्ट्र आघा़डीवर आहे. राज्यात आजपर्यंत लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.

Advertisements

Related Stories

केंद्राने मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी

Patil_p

रमजान ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीला गर्दी

Patil_p

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 31,671 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

Rohan_P

‘सूर्य’ तळपला, मुंबई इंडियन्स जिंकली!

Omkar B

दिघंचीत गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!