तरुण भारत

ब्रेकिंग : पुण्यात केमिकल कंपनीत अग्नितांडव; 17 कामगारांच्या मृत्यूची शक्यता

ऑनलाईन टीम

पुण्यातील मुळशी एमआयडीसीत सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. या अग्नितांडवात 17 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये 15 महिला आणि दोन पुरषांचा समावेश आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली. 11 मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून बचावकार्य सुरू आहे.

मुळशी तालुक्यातील अरवडे गावाजवळ SVS ही सॅनिटायझर बनवणारी कंपनी आहे. कंपनीला भीषण आग लागल्यानंतर अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनीत अडकेलल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने भिंती पाडून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.

Advertisements

Related Stories

अटी व शर्तींसह दुकाने उघडण्यासाठी नगरपालिकेची परवानगी

Abhijeet Shinde

जगभरात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

तळेगाव दाभाडे येथे बडोदा बँकेच्या एटीएम कक्षाला आग

Rohan_P

मुंबईत चार तासांच्या वर पाणी साचू देणार नाही – किशोरी पे़डणेकर

Abhijeet Shinde

वायू प्रदूषण चिमुकल्यांसाठी घातक

Omkar B

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी 104 लसीकरण केंद्र

Rohan_P
error: Content is protected !!