तरुण भारत

टेस्लाकडून भारतात भरतीचे नियोजन

व्यवसाय विस्तारासाठी विविध राज्यांशी चर्चा -महत्त्वाच्या पदांवर करणार नियुक्ती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला भारतात आपले जाळे  पसरण्याच्या कामाला गती देताना दिसते आहे. येणाऱया काळात कंपनीत नेतृत्व करण्यासाठी व वरीष्ठ पातळीवर योग्य उमेदवारांची टेस्ला भरती करण्यावर भर देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत मेनन हे गेली चार वर्षे कंपनीत योगदान देत असून त्यांची आता कंपनीत संचालक म्हणून बढती झाली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीसाठी भारतात कंपनी प्रयत्न करणार आहे. यासाठीच येणाऱया काळात भरतीवर जोर दिला जाणार आहे. विक्री आणि विपणन प्रमुख आणि एचआर प्रमुख पदावर योग्य उमेदवाराच्या शोधात कंपनी आहे. कंपनी भारतात विक्रीचे जाळे वाढवण्यासाठी विविध राज्य सरकारांशी बोलणी करत आहे. शोरूम आणि संशोधन व विकास केंद्रे तसेच उत्पादन कारखानेही सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. इलेक्ट्रीक वाहन निर्मितीसंदर्भात भारत सरकारच्या धोरणांवर टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क बारीक लक्ष ठेऊन आहेत.

1 टक्क्यापेक्षा कमी इलेक्ट्रीक कार्सची विक्री

देशात इलेक्ट्रीक कार्सच्या विक्रीचा आढावा घेतल्यास 1 टक्क्यापेक्षा कमी इ-कार्स विकल्या जातात, असे सांगितले जाते. भारतात चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. या सुविधा सुकर झाल्यास भारतीयांमध्ये इलेक्ट्रीक कार्स घेण्याबाबत उत्सुकता वाढताना दिसेल.

Related Stories

महिंद्राच्या सीईओपदी आशिष शहा

Patil_p

चहा उत्पादन 54टक्के घटले

Patil_p

जीएसटी संकलन-वीज विक्रीने अर्थव्यवस्था सुधारणार ?

Patil_p

मेट्रो शहरात भरतीचे प्रमाण वाढले

Omkar B

‘रिलायन्स’ देशातील तिसरा मोठा व्यावसायिक समूह

Patil_p

इक्सिगोचा येणार आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!