तरुण भारत

शाओमी ‘एमआय 11 अल्ट्रा’ला होणार विलंब

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनी कंपनी शाओमीचा बहुप्रतिक्षीत ‘एमआय 11 अल्ट्रा’ स्मार्टफोन ग्राहकांना मिळण्यास आणखी काही दिवस जावे लागणार असल्याचे कंपनीने नुकतेच स्पष्ट केले आहे. सदरच्या फोनबाबत ग्राहकांकडून कंपनीकडे विचारणा करण्यात येत होती. अखेर कंपनीने सदरच्या फोनच्या विलंबाबाबत खरं कारण सांगून टाकलं आहे.

Advertisements

सद्यस्थितीत एमआय 11 अल्ट्रा स्मार्टफोन वितरणात अडथळे जाणवत असून अनिश्चित काळासाठी हा फोन ग्राहकांकरीता उपलब्ध होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सदरचा फोन एप्रिलअखेर लाँच केला होता, ज्याची किंमत 69 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. यासोबत कंपनीने एमआय 11 एक्स आणि एमआय 11 एक्स प्रो हे दोन किफायतशीर किंमतीचे फोन सादर केले होते. 11 एक्स व 11 एक्स प्रो हे दोन्ही फोन ग्राहकांकरीता त्याचवेळी खरेदीकरीता उपलब्ध केले गेले. अल्ट्रा या फोनबाबत पहिल्यांदाच असं झालंय की लाँच झाला पण नंतर ग्राहकांकरीता खरेदीकरता उपलब्ध झाला नाही.

स्पष्टता नाहीच

सदरच्या फोनच्या शिपमेंटबाबत (जल मालवाहतुक) अनंत अडथळय़ांना कंपनीला सामोरे जावे लागते आहे, असे कळते. या फोन्सचा भारतात पुरवठा होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. पण हा कालावधी किती लागणार आहे याचे स्पष्टीकरण मात्र कंपनीला करता आलेले नाही.

Related Stories

शाओमीने विकले 30 लाख एमआय सिरीजचे स्मार्टफोन्स

Patil_p

…विवोचा ‘वाय 1 एस’ स्मार्टफोन सादर

Patil_p

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

संगणक क्रांतीचे युग

tarunbharat
error: Content is protected !!