तरुण भारत

राजपुत्र हॅरी अन् मेगन यांना कन्यारत्न

लिलिबेट डायना असे नामकरण

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

Advertisements

डय़ूक आणि डसेच ऑफ ससेक्स राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल यांनी स्वतःच्या दुसऱया अपत्याच्या जन्माची घोषणा केली आहे. दोघांनी स्वतःच्या मुलीला लिलिबेट डायना नाव दिले आहे. लिलीच जन्म सेंटा बार्बरा कॉटेल हॉस्प्टिल, कॅलिफोर्नियात शुक्रवारी 4 जून रोजी झाला होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय sतसेच दिवंगत राजकन्या डायना यांच्यावर आधारित लिलीचे नाव ठेवण्यात आले आहे. कुटुंबात महाराणींचे टोपणनाव लिलिबेट आहे. नवजात मुलीचे छायाचित्र अद्याप प्रसारित करण्यात आलेले नाही.

या दांपत्यला आर्ची नावाचा मुलगा असून त्याचा जन्म 2019 मध्ये झाला होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा नातू हॅरी आणि त्याची पत्नी मेगनने मागील वर्षी मार्च महिन्यात प्रंटलाइन रॉयल डय़ुटीचा त्याग केला होता आणि दोघेही कॅलिफोर्नियात राहत आहेत. मागील वर्षी जानेवारीमध्ये दोघांनीही डय़ूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्सची ही उपाधी सोडण्याची घोषणा केली होती.

Related Stories

भारतीय कंपन्यांनी दिला अमेरिकेत सव्वा लाख लोकांना रोजगार

datta jadhav

उत्तर कोरियाने समुद्रात डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

Patil_p

साखळी बॉम्बस्फोटात 2 ठार; अवघ्या 100 मीटरवर होता भारतीय संघ

datta jadhav

101 वर्षांची ‘लॉबस्टर लेडी’

Patil_p

रशियात बाधितांची संख्या 9 लाखासमीप

Patil_p

हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा

datta jadhav
error: Content is protected !!