तरुण भारत

देशात 86,498 नवे बाधित, 2123 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. सोमवारी देशात 86 हजार 498 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 63 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 5 एप्रिलला 96 हजार 563 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 1 लाख 82 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2123 रुग्ण दगावले. 

Advertisements

देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 13 लाख 03 हजार 702 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 51 हजार 309 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

आतापर्यंत देशातील 23 कोटी 61लाख 98 हजार 726  नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. 

Related Stories

भारतात 44,376 नवे कोरोना रुग्ण; 481 मृत्यू

pradnya p

भाजप कार्यकाळात महागाई दर कमीच

Patil_p

छेडछाडीदरम्यान दुर्घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू

Patil_p

हेगडेंच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

prashant_c

दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

Patil_p

लॉकडाऊन वाढवल्यानंतर हरियाणा सरकारने केली ‘ही’ घोषणा

pradnya p
error: Content is protected !!