तरुण भारत

शेतकऱयांना बियाणे-खतांचे वितरण वेळेत करा

कृषीमंत्री बी. सी. पाटील यांची अधिकाऱयांना बैठकीत सूचना : कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास कारवाईचा इशारा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

गेल्या काही वर्षांपासून पावसाने चांगली साथ दिली आहे. उत्पादनही चांगले निघत आहे. यावषीही उत्पादन वाढीच्यादृष्टिने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱयांना उत्तम दर्जाची बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या. शेतकऱयांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येवू नयेत, याची दक्षता घ्या, असे कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी अधिकाऱयांना सांगितले.

जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये मंत्री बी. सी. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी कृषी संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करून अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या. या बैठकीला महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, इराण्णा कडाडी, मंगला अंगडी यांच्यासह आमदार व अधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये 142 मि. मी. इतक्मया पावसाची आवश्यकता आहे. मागीलवषी 244 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जवळपास 72 टक्के पाऊस अधिक पडला आहे. त्यामुळे उत्पादन चांगले निघाले आहे. राज्यामध्ये एकूण 77 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे बी-बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत. याचबरोबर खतांचा साठाही उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. तो साठा योग्यप्रकारे वितरित करावा, असे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय खतांचा वापरही करण्यास शेतकऱयांना मार्गदर्शन करावे. सेंद्रिय डीएपी खते विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. शेतकऱयांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून खत वापरण्यास भाग पाडावे, असेही यावेळी सांगितले. खत फेडरेशनच्या माध्यमातून पुरेसे खत वितरित करणे बंधनकारक आहे. काळाबाजार करून खतांची विक्री करणाऱयांवर कारवाई केली जाईल. अधिकाऱयांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिला.

पीक सर्वेक्षणासाठी सॉप्टवेअरचा वापर करा

पीक सर्वेक्षण करण्यासाठी आता सॉप्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याचा योग्यप्रकारे वापर करावा. पीक सर्वेक्षण भू-सॉप्टवेअरशी सोडले जाईल. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी संशोधक तसेच शेतकऱयांशी चर्चा, सल्ला मसलत करून निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान योजनेत राज्याचा प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत राज्याचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. पीक सर्वेक्षण करण्यामध्येही राज्य पुढे असून याबद्दल त्यांनी अधिकाऱयांचे कौतुक देखील केले आहे. राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकमध्ये राबविण्यात येणाऱया योजनांबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे मंत्री बी. सी. पाटील यांनी सांगितले.

महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ऊस तोडणी यंत्राची खरेदी अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा सरकारकडे पाठपुरावा करून ऊस उत्पादक शेतकऱयांना सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली. ‘माझे पीक माझा हक्क आहे’ या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे खासदार इराण्णा कडाडी यांनी सांगितले. आमदार पी. राजीव यांनीही शेतकऱयांनी विहिरींच्या संरक्षणाबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱयांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही., कृषी अधिकारी शिवनगौडा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

चिकोडीला कृषी जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत प्रयत्न

चिकोडीला कृषी जिल्हा घोषित करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी बैठकीत दिली. चिकोडी जिल्हय़ाला शैक्षणिक जिल्हय़ाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचप्रकारे कृषी जिल्हा म्हणूनही घोषित करण्याबाबत विचार विनिमय सुरू असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतरित करा

Patil_p

बँकांमधून रोख रक्कम काढणाऱयांची संख्या वाढली

Amit Kulkarni

सांडपाणी प्रकल्पासाठी पुन्हा शेतकऱयांच्या पिकावर बुल्डोजर

Rohan_P

सेटबॅकप्रकरणी मनपाचे अधिकारी ‘मॅनेज’?

Omkar B

फिल्मी स्टाईलने पाठलाग करत युवकाचा भीषण खून

Rohan_P

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे साहित्य वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!