तरुण भारत

रवा मँगो लाव्हा केक

मैत्रिणींनो, लवकरच आंब्यांचा हंगाम संपेल. तुम्ही यंदाच्या हंगामात आंब्याचे अनेकविध पदार्थ केले असतील. आता मँगो स्टफ मिनी केक किंवा मँगो लाव्हा केक करून बघा.

साहित्य : एक कप रवा, अर्धा कप दूध, अर्धा कप मँगो पल्प, पाव चमचा वेलची पूड, मँगो इसेंसचे दोन ते तीन थेंब, अर्धा कप पिठी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, थोडं तेल आणि आंब्याचे तुकडे.

Advertisements

कृती : एका भांडय़ात रवा, पिठी साखर, बेकिंग पावडर आणि वेलची पूड घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. यात आंब्याचा रस घाला. मग दूध घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवा. रवा थोडा फुगल्यावर सर्व घटक पुन्हा नीट मिसळून घ्या. आता आप्पे पात्र घेऊन त्याला थोडं तेल लावा. त्यात दोन चमचे मिश्रण घालून वरून आंब्याचे तुकडे घाला. त्यानंतर पुन्हा मिश्रण घालून दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्या. तुमचा रवा मँगो केक तयार आहे.

Related Stories

राईस टिक्की

Omkar B

चटपटीत ऑलिव्ह सॅलड

Amit Kulkarni

बनवा कडधान्याचं सँडविच

tarunbharat

कोकोनेट मोहन पॅक

Amit Kulkarni

मटण कोरमा

tarunbharat

रागी कांजी

Omkar B
error: Content is protected !!