तरुण भारत

कोल्हापूर : शिरोळमध्ये मटण विक्रेता निघाला कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / शिरोळ

नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर शहरातील व्यापारी व भाजी विक्रेत्यांकडून अ‍ॅन्टीजन तपासणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी आणखी काही व्यापारी व अन्य दुकानदार तसेच लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसह ११० जणांची अ‍ॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये मटण विक्रेत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर संपर्कातील एका मुलगीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

येथील शिवाजी तख्तामध्ये नगरपालिका व ग्रामीण रुग्णालयाकडून शनिवारी अ‍ॅन्टीजन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १२४ जणांची तपासणी करण्यात आली होती. एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला तात्काळ अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी, भाजी विक्रेते यांची अ‍ॅन्टीजन तपासणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे. सोमवारी देखील ११० जणांची अ‍ॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, लक्षणे असणाºया प्रत्येक नागरिकांनी अ‍ॅन्टीजन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Related Stories

वस्त्रनगरीतील यशस्वी उद्योजक मल्लय्या दत्तात्रय स्वामी यांचे वृध्दापकाळाने निधन

triratna

केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण संविधानिक मूल्याच्या विरोधात

triratna

कोल्हापुरात कोरोनाचे 3 बळी, 118 पॉझिटिव्ह

triratna

पंढरपूर जवळील अपघातात चंदगड येथील पाच ठार तर 11 जण जखमी

triratna

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्त आपल्या घरासमोर करणार आंदोलन

triratna

कोल्हापूर विभागातील सव्वालाख विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होणार

triratna
error: Content is protected !!