तरुण भारत

लसीकरणानंतर…

सध्या कोरोनाविरोधी लसीकरण सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ही लस घेणं आवश्यक आहे. मात्र ही लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम समोर येऊ शकतात. थोडाफार त्रास होऊ शकतो. हा त्रास किंवा दुष्परिणाम टाळण्यासाठी थोडीफार काळजी घेता येईल. तुम्हीही लसीकरणाठी नोंदणी केली असेल तर ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

  • लसीकरणानंतर ताप येणं तसंच अशक्तपणा असे दुष्परिणाम जाणवणं ही सर्वसामान्य बाब आहे. साधारण दोन ते तीन दिवस हा त्रास जाणवू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडतील आणि तुम्हाला बरं वाटेल. लस घेतल्यानंतर किमान दोन दिवस तरी पाण्याचं प्रमाण वाढवा. तुम्ही नारळपाणी फळांचे रसही पिऊ शकता.
  • लस घेतल्यानंतर शरीरात कोरोनाविरोधी प्रतिपिंड तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होते. या प्रक्रियेसाठी रोगप्रतिकारक क्षमतेला बरीच मेहनत घ्यावी लागते. या प्रक्रियेदरम्यान सांधेदुखी, डोकेदुखी, मळमळणं असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात फार दगदग करू नका. शक्य असल्यास आराम करा. लस घेण्याआधी आणि त्यानंतर पुरेशी झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करा. ताणमुक्त राहिल्याने तसंच पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती बळकट होऊन प्रतिपिंड तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते.
  • लस टोचलेल्या भागावर सूज, वेदना किंवा पुरळ उठण्यासारखी लक्षणंही दिसून येतात. यामुळे हाताची हालचाल करणं अवघड होऊन बसतं. अशा परिस्थितीत संबंधित भागावर बर्फ किंवा ओला कपडा ठेवा. यामुळे आराम मिळू शकेल. हातांचा सौम्य व्यायामही करता येईल.
  • लसीकरणानंतर होणारा त्रास दोन दिवसांनी आपोआप बरा होतो. पण तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेता येतील.
  • निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. पोषक आहार घ्या. प्रथिनं, झिंक, कॅल्शियम, लोह तसंच अन्य पोषक घटकांची युक्त आहार घ्या. तेलकट तसंच प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नका.

Related Stories

आम आदमीच्या ‘गोवन्स अगेंस्ट करोना’ मोहिमेंतर्गत ऑक्सिमित्र उपक्रमास मांद्रे मतदार संघांत शुभारंभ

GAURESH SATTARKAR

ठसठसणारी शीर

Amit Kulkarni

लूनर डाएट म्हनजे काय ?

tarunbharat

हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना देणार एक्सरे

Patil_p

प्लाझ्मा थेरपीचा अंतरगात

Amit Kulkarni

शिगेलोसिस म्हणजे काय ?

Omkar B
error: Content is protected !!