तरुण भारत

कोल्हापूर : हुपरीच्या चांदी उद्योजकाची स्‍वत: वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

हुपरी/वार्ताहर

हुपरी नगरीतील एका चांदी उद्योजकाने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अमोल माळी (वय-५५ ) असे या चांदी उद्योजकाचे नाव आहे. माळी यांनी आजाराला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. त्याच्या आत्महत्येनंतर हुपरी परिसरात एकच खळबजनक उडाली. आज, मंगळवार सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

चांदी व्यापारी उद्योजक अमोल माळी हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते . त्‍यांच्यावर उपचारही सुरू होते. त्‍यांना नुकताच डिस्‍चार्जही मिळाला होता. घरी आल्यावर आजाराच्या वेदनेने घायाळ झालेल्या अमोल यांनी राहत्या घरी  आजाराला कंटाळून त्‍यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व  पोलीस फौजफाटा  दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरु आहे.

Related Stories

कोल्हापूर : कोरोना औषध पुरवठा ५ ऑक्टोबरपासून होणार बंद

triratna

मेट्रॉलॉजी प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला मंजूरी

Shankar_P

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

triratna

औषध विक्रेत्यांना विमा सुविधेचा लाभ मिळणे गरजेचे – आमदार आबिटकर

Shankar_P

खोची येथे दारूच्या नशेत कीटकनाशक प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

Shankar_P

गांधीनगर मुख्य रस्त्यावर केळी विक्रेत्या महिलेचा खून

triratna
error: Content is protected !!