तरुण भारत

पंतप्रधान मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक संपली


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

live update :

मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या पत्रकार परिषदेस सुरूवात झाली आहे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, मुख्यमंत्र्यांचा गाड्यांचा ताफा महाराष्ट्र सदनाच्या दिशेनं रवाना झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर पत्रकार परिषद घेणार आहेत. 

पाऊण तासापासून मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद घेऊन बैठकीसंदर्भात माहिती देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट होतेय.

मुख्यमंत्री शिष्टमंडळ दिल्ली विमानतळावरुन महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.Related Stories

अखेर चीनचे अनियंत्रित रॉकेट कोसळले

datta jadhav

देशातील चित्रपटगृह 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार

datta jadhav

पुलाची शिरोलीत वृध्द महिला कोरोना पॉझिटिव्ह

Shankar_P

तरुणाचा खून, तीघे अटक

Shankar_P

पुणे : मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : जिल्हाधिकारी

pradnya p

मिरजेत आमदार पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

triratna
error: Content is protected !!