तरुण भारत

युवा रक्तदाता संघटना ठरतेय कोरोनात ‘ब्लड बँक’ !

ओटवणे / प्रतिनिधी-

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियोजित रक्तदान शिबिरे रद्द झाल्यामुळे रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यात कित्येक रक्तदात्या युवकांनी लस घेतल्यामुळे सर्वसाधारण रक्तगटाचा रक्तदाता सुद्धा शोधणे जिकरीचे जात आहे. पर्यायाने जिल्हा व उपजिल्हा,तालुका रुग्णायांमधून रक्तासाठी धावाधाव सुरु आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरोना संकटकाळातही युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी आणि त्यांचे सहकारी स्व:ताचा जीव धोक्यात घालून रक्ताच नात जपत आहेत.कुणाला रक्ताची गरज असल्याचे समजताच अथक प्रयत्न करून कमी वेळात गरजु रुग्णांना रक्तदाते उपलब्ध करुन देत आहेत.

Advertisements

युवा रक्तदाता संघटनेने रविवार पासुन आतापर्यंत सलग ३ दिवस ओ पॉझिटीव्ह रक्तगटाचे ३ रक्तदाते वेगवेगळ्या रुग्णालयमध्ये अँडमिट असलेल्या रुग्णांना उपलब्ध करुन दिले. यासाठी आशिष साखळकर, हर्षल भांगले, वैभव कोरडे यांनी हे रक्तदान केल. तर गोवा बांबोळी रूग्णालयात अत्यवस्थ रुग्णाला बी पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना वैभव दळवी, रोशन राऊळ यांनी गोवा मेडीकल काॅलेज बांबोळी येथे जाउन रक्तदान केले आणि त्या रुग्णाचे प्राण वाचविले. तसेच गेल्या मे महिन्यापर्यंत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरातील रक्तदान कार्ड गरजू गरीब रुग्णांना वितरण केली. तसेच रक्तदाते, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसह औषधांसाठी रुग्णमित्र म्हणून युवा रक्तदाता संघटना निस्वार्थीपणे रात्रं दिवस कार्यरत आहे.

Related Stories

रत्नागिरी : बारसू रिफायनरीसाठी राज्य शासन सकारात्मक

triratna

पाचल मंडळ कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा

triratna

जिल्हय़ाला पुराचा धोका, मोठी पडझड

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 3 बळी, 104 नवे रुग्ण

triratna

चिपळुणात मारहाण प्रकरणी 21जणांवर गुन्हे

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन 8 रूग्ण पॉझिटीव्ह

Patil_p
error: Content is protected !!