तरुण भारत

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाकडून रद्द, खासदारकी धोक्यात

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने रद्द ठरवले आहे. न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त खंडपिठाने निकाल देत खासदार नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंडही या संपुर्ण प्रकरणात ठोठावला आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. या जात प्रमाणपत्राच्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्राला न्यायालयाने आज अवैध ठरवले आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांना दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता आगामी काळात नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. 


नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकीदरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील 2017 च्या याचिकेवर निकाल देताना खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे. 


प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असे निरीक्षण हायकोर्टांने नोंदवले आहे. त्यांना सहा आठवड्यांमध्ये जात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत. 


नवनीत राणा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तयारी आनंदराव अडसूळ यांनी दाखवली आहे. नवनीत राणा यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले हा मोठा गुन्हा आहे. त्यामूळे त्यांना तुरूंगवास देखील होऊ शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे असल्याचेही शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी म्हटले आहे. यासोबतच मुंबईतल्या आजोबांचेही प्रमाणपत्र हे बनावटरीत्या तयार करण्यात आल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी यावेळी केला आहे. तसेच नवनीत राणा यांच्या आजोबांचे प्रमाणपत्रही मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Stories

सातारा : कारवाई करण्यासाठी पालिकेची आता पाच पथके सक्रिय

Abhijeet Shinde

चंदूर तीन दिवस बंद

Abhijeet Shinde

मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

Abhijeet Shinde

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद राहणार

Patil_p

सातारा : कोरोना काळात जनजागृतीसह काळजी घेणे आवश्यक : डॉ. सचिन पाटील

Abhijeet Shinde

मॉर्निंग वॉकवाल्यांना 73 हजार रूपये दंड

Patil_p
error: Content is protected !!