तरुण भारत

दिलासादायक : दिल्लीतील 14 लाख 161 रुग्ण कोविडमुक्त!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 316 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 41 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 29 हजार 791 वर पोहचली आहे. यामधील 24 हजार 668 वर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 521 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 14 लाख 00 हजार 161 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 24,668 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 98 लाख 93 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 48,574 आरटीपीसीआर टेस्ट आणि 23,305 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.

 
दिल्लीत मागील 24 तासात 66,175 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 33,767 जणांना पहिला डोस 32,408 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 57 लाख 32 हजार 699 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Related Stories

चिंताजनक! देशातील रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; मागील 24 तासात 46,164 नवे कोरोना रूग्ण

Rohan_P

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या ; भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हे प्रचाऱ्याच्या मैदानात

triratna

बंगालमध्ये 50 वर्षांपासून विकास ‘डाउन’

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 71 हजार रुग्णांची कोरोनावर मात! पण ‘हा’ आकडा चिंताजनक

Rohan_P

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

datta jadhav

देशात संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांखाली

datta jadhav
error: Content is protected !!