तरुण भारत

युएईत पारा 51 अंश सेल्सिअसवर

मुलांना कारमध्ये एकटे सोडल्यास 10 वर्षांची शिक्षा

संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) सध्या उष्णतेने कहर चालविला आहे. अल ऐनच्या स्वीहानमध्ये रविवारी पारा 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. यंदाचा हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. मेच्या तुलनेत जूनमध्ये तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढले आहे. युएई आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष पाहणार असल्याचे म्हणणे तूर्तास घाईचे ठरणार असल्याचे उद्गार राष्ट्रीय हवामान केंद्राच्या प्रवक्त्याने काढले आहेत. यापूर्वी जुलै 2002 मध्ये पारा 52.1 अंशांवर पोहोचला होता.

Advertisements

आईवडिल किंवा पालकांनी कुठल्याही कारणास्तव मुलांना कारमध्ये सोडून दिल्यास हा गुन्हा ठरणार असल्याचा इशारा अबू धाबी पोलिसांनी दिला आहे. अशा लोकांना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख दिरहमपर्यंतचा (2 कोटी रुपये) दंड भरावा लागू शकतो.

जुने टायर बदलण्याचा निर्देश

‘समर-सेफ-ट्रफिक’ मोहिमेच्या अंतर्गत अबू धाबी पोलिसांनी चालकांनी वाहनांच्या टायर्सची तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच जुने किंवा खराब झालेले टायर बदलण्याची सूचना करण्यात आली आहे.

वाहनातील तापमान अधिक

अधिक उष्णतेत मुलांना वाहनात सोडणे जीवघेणे ठरू शकते. कारण बाहेर तापमान 40 अंश असल्यास 10 मिनिटातच बंद वाहनातील तापमान 60 अंशांपर्यंत पोहोचू शकते. हीट स्ट्रोक किंवा सफोकेशनमुळे मुलांचा जीव जाऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. शासकीय नोंदीनुसार दरवर्षी सरासरी 40 मुलांचा मृत्यू या कारणामुळे होतो. 55 टक्के आईवडिलांना अशा धोक्याची जाणीवच नसते.

Related Stories

400 वर्षे जुन्या बेटावर वास्तव्य करता येणार

Patil_p

सीडीसीचे आवाहन

Patil_p

पॅरिस : जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला

datta jadhav

कोरोना विषाणू पुन्हा बदलतोय स्वतःचे स्वरुप

Patil_p

10 फूट लांब मगरीने गिळला बूट

Patil_p

परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द

prashant_c
error: Content is protected !!