तरुण भारत

चोपडे येथील नागरिकांचा तरंगत्या जेटीस विरोध

प्रतिनिधी/ म्हापसा

चोपडे नदीत जी तरंगती जेटी घालण्याचा सरकारने डाव आखला असून त्या तरंगत्या जेटीला चोपडे गावातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य दिपक कळंगुटकर यांच्या नेतृत्वाखाली पोर्टमंत्री मायकल लोबो यांची घेट घेऊन याबाबत एक निवदेनही त्यांना सादर केले आहे.

Advertisements

या निवेदनावर जिल्हा पंचायत सदस्य मोरजी सतीश शेटगावकर, दिपक कळंगुटकर, चोपडे पंच नितीन चोपडेकर, माजी सरपंच चोपडे अमोल राऊत, माजी उपसरपंच रवी राऊत, पार्से पंच अरुण पार्सेकर, चोपडेतील नागरिक हेमंत चोपडेकर, एकनाथ चोपडेकर यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटल्याप्रमाणे शापोरा नदी मासे विक्रेत्यांचा आर्थिक कणा आहे. येथे मासेमारी करणारे आपला पारंपरिक व्यवसाय करतात. पण या जागेतच सरकारने चोपडे गावात तरंगती जेटी घालण्याचा घाट घातला आहे. जेणेकरून येथे बाहेरील दिल्लीवाले व विदेशी पर्यटक येऊन मोठय़ा प्रमाणात जमिनी खरेदी करणार आहेत. त्याचा परिणाम स्थानिकांवर होणार आहे. हे आम्ही स्थानिक कदापी सहन करणार नसून हा सरकारचा निर्णय त्यांनी मागे घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे. शिवाय ही नदीही प्रदूषित होणस वेळ लागणार नाही. आम्हा सर्व गावकऱयांचा या चोपडेतील तरंगत्या जेटीस साफ विरोध असून सरकारचा हा जेटी घालण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामस्थांना त्रास करून आम्हाला तरंगत्या जेटी नको- मंत्री मायकल लोबो

मंत्री मायकल लोबो म्हणाले की, आपल्यास चोपडे गावातील नागरिकांचा तरंगत्या जेटीस विरोध असल्याचे निवेदन आले आहे. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून जर नागरिकांना नको तर या जेटीसाठी अन्य जागा शोधावी लागणार आहे. तरंगत्या जेटी पॅप्टन ऑफ पोर्ट व केंद्र सरकारने मान्य करून दिल्या आहे. या जेटी स्थानिक नागरिक व पर्यटकांसाठी आहे. त्या कायमस्वरूपी नाही. जेव्हा गावचे नागरिक खर विरोध करतात तर त्या जेटी अन्यत्र घालण्यात येईल. मासेवाल्यांना त्रास करून आम्हाला त्या जेटी नको आहेत अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली.

Related Stories

पालिका अध्यादेशातील जाचक तरतुदी मागे घेण्याची मागणी

Amit Kulkarni

दवर्ली येथे धावत्या टेम्पोला आग

tarunbharat

डिचोली तालुक्मयाला पावसाने झोडपले

Omkar B

कुडचडेवासियांचा स्वाभिमान जागा झाल्याचे निकालातून स्पष्ट

Amit Kulkarni

पूरग्रस्तांना दोन महिन्यात घरे

Omkar B

100 बेघरांच्या साहाय्यासाठी पुढाकार घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!