तरुण भारत

देशात पावणेतीन कोटी रुग्णांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संक्रमितांच्या आकड्यापेक्षा मोठी आहे.मंगळवारी 1 लाख 62 हजार 664 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 04 हजार 126 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Advertisements

92,596 नवे रुग्ण 
देशात मागील 24 तासात 92 हजार 596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2219 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2 कोटी 90 लाख 89 हजार 069 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 लाख 53 हजार 528 रुग्ण दगावले आहेत. 

आतापर्यंत देशातील 23.90 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 23 हजार 077 वर, तर कोरोनामुक्तीचे प्रमाण 20.57 टक्के

prashant_c

कित्येक तास काम केल्यावर रडतच घरी परततो!

Patil_p

राम मंदिर : आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

triratna

चिंताजनक ! राज्यात कोरोनाने 349 मृत्यू, 63 हजार 294 नवे रुग्ण

Shankar_P

तेलंगणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम कोसळले; 9 मजूर जखमी

datta jadhav

व्यावसायिक सिलिंडर 55 रुपयांनी महागला

Omkar B
error: Content is protected !!