तरुण भारत

‘या’ ॲपने भारतीयांना घातला 250 कोटींचा गंडा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका ॲपने उत्तराखंडमधील लोकांना 4 महिन्यात 250 कोटींचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी एकास अटक केली आहे.  

Advertisements

‘पॉवर बँक’ या चिनी ॲपद्वारे 15 दिवसात पैसे दुप्पट होणार असल्याचे आमिष दाखवले जात होते. विशेष म्हणजे हे ॲप भारतातील 50 लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. त्यामधील काही लोकांनी या ॲपमध्ये पैसेही गुंतवले. मात्र, हरिद्वारचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपले पैसे दुप्पट न झाल्याने पोलिसात धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.  

तक्रारदाराने या ॲपमध्ये दोन वेळा 93 हजार आणि 72 हजार अशी रक्कम जमा केली होती. मात्र, हे पैसे दुप्पट झाले नाहीत. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दिली. तपासादरम्यान ही सर्व रक्कम वेगवेगळय़ा बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली असून, भारतीय लोकांची या ॲपद्वारे 250 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

Related Stories

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Rohan_P

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार पार

Rohan_P

सुरक्षित शहरांच्या यादीत दिल्ली-मुंबईचा समावेश

Patil_p

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Rohan_P

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,34,403 वर

Rohan_P

युद्धविमानांच्या संरक्षणासाठी देशी तंत्रज्ञान विकसित

Amit Kulkarni
error: Content is protected !!