तरुण भारत

सांगली : वाङ्मय प्रकल्प समितीवर प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वाङ्मय प्रकल्प समितीवर नियुक्त सदस्य म्हणून प्रा. अविनाश सप्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे या समितीचे अध्यक्ष असून डॉ. रमेश वरखेडे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नितीन रिंढे आणि नाटककार प्रेमानंद गज्वी हे अन्य सदस्य आहेत. मंडळाकडे आलेल्या विविध वाङ्मयीन प्रकल्पांची चर्चा करून निर्णय घेणे, ग्रंथांना आर्थिक मदत देणे, मंडळाच्या वतीने महत्त्वाच्या विविध विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करणे, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या सदरामध्ये मान्यवरांची चरित्रे प्रकाशित करणे, जागतिक ग्रंथांचे अनुवाद प्रकाशित करणे अशी महत्त्वाची कामे या समितीमार्फत केली जातात.

प्रा. अविनाश सप्रे या समितीप्रमाणेच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ‘भारतीय भाषा आणि साहित्य’ या विभागाचे समन्वयक संपादक म्हणुनही कार्यरत आहेत.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाखांहून अधिक

Rohan_P

सांगली : वाळव्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

Abhijeet Shinde

आटकेतील युवकाच्या मृत्यूने तणाव

Patil_p

कोल्हापुरात होणार कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी

Abhijeet Shinde

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या ऑफरला उर्मिलाचा नकार : विजय वडेट्टीवार

Rohan_P
error: Content is protected !!