तरुण भारत

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात भर पावसात कारपेटचे काम

प्रतिनिधी / सातारा : 

पाटण तालुक्यातील तारळी नदीवरील तारळी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये रिंग रोड रस्त्याचे काम भर पावसात केले जात आहे. हे नियमबाह्य कारपेट टाकण्यात येत असून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच शाखा अभियंता घोडके यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुडे येथील उपसरपंच सुहास माने यांनी बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.  

Advertisements

माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तारळी धरणाच्या पाठीमागे मुरुड परिसरात रिंगरोडचे काम पावसात सुरु होते. कारपेट टाकले जात होते. तेथील मुकादमास विचारणा केली असता त्याने रावसाहेब घोडके यांनीच काम करायला सांगितले असल्याचे सांगितले. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, शासनाच्या दि.7 जून 2021 च्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून शाखा अभियंता घोडके आणि ठेकेदार यांनी संगणमत करुन काम केले. कामासाठी वापरलेली खडी आणि टाकलेले कार्पेट याची जाडी खूप कमी आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे. 

पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. अतिवृष्टी होत असते. त्यात हे काम तारळी धरणाच्या भिंतीपासून बॅक वॉटरच्या डाव्या व उजव्या बाजूला असणाऱ्या रिंगरोडचे आहे. त्यामुळे पावसात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामातून मोठा आर्थिक फायदा व्हावा या हेतूने ठेकेदार व शाखा अभियंता यांनी हे काम हेतूपुरस्पर निकृष्ट दर्जाचे केले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. ठेकेदाराचे बिल काढण्यात येवू नये, त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Related Stories

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भाजपा जिल्हापदाधिकाऱ्यांचा सत्कार

Abhijeet Shinde

हे गणराया, कोरोनाचे विघ्न टळूू दे!

datta jadhav

विरोधकांनी अडथळे आणले तरीही महाविकास आघाडी डगमगणार नाही : ना.शंभूराज देसाई

Abhijeet Shinde

कराडच्या नगराध्यक्षा पुन्हा सक्रीय

Patil_p

पुन्हा ढगाळ वातावरण

Patil_p

सातारा : महाराष्ट्र केसरीसाठी जिल्ह्यातून मॅटसाठी सरक तर मातीसाठी सुळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!