तरुण भारत

जीमेल ग्राहकांसाठी गुगलची सुरक्षा

प्रतिदिन 10 कोटी फिशिंग ऍटॅक थांबवितो

नवी दिल्ली 

Advertisements

गुगल जगभरातील सध्याच्या जीमेल ग्राहकांसाठी फिशिंग मेल सिक्युरिटी करत आहे. यामध्ये प्रतिदिन 10 कोटी ग्राहकांच्या जीमेल खात्यावर होणाऱया फिशिंग प्रयोगांना रोखण्याचेही काम करते. यासोबत गुगल प्लेवरील 10,000 कोटी ऍप्सवर मेलवेअरना स्कॅन करतो. हीच बाब लक्षात घेता आपल्या खात्यावर होणाऱया सायबर हल्ल्यापासून सुरक्षा करता येणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

मागील सहा महिन्यांपासून डिजिटल उद्योगांवर इतिहासातील सर्वाधिक आणि धोकादायक असे सायबर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमुळे खासगी क्षेत्र, सरकारी क्षेत्रातील कोणीही वाचू शकणार नसल्याचेही नमूद केले आहे.

धोके शोधण्याचा प्रयत्न

गुगलमध्ये ग्लोबल अफेयर्स एसव्हीपी, पेंट वॉकर यांनी म्हटले आहे, की ‘आम्ही या कालावधीत खूप काळजीत आहोत. सुरक्षा ही बाब आम्ही महत्त्वाची मानली आहे. अशा प्रकारचे अनेक धोके शोधून त्यावर उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत.’

सुरक्षा वाढल्याने हल्ले वाढले

वॉकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्ही सोलरविंड्स आणि मायक्रोसॉफ्ट एक्सचेंजवरील हल्ल्याकडे पाहिल्यास स्वहक्क प्रणाली आणि इंटरऑपरेबिलिटी तसेच डाटा पोर्टेबिलिटीवर प्रतिबंध करण्याची सुरक्षा वाढविल्यास त्या प्रमाणात हल्ले करण्याचे प्रयोगही वाढत जात असल्याचे दिसून येते.’

Related Stories

चढउताराच्या प्रवासात बाजार स्थिरावला

Patil_p

5 शेअर्सनी 9 महिन्यात केले पैसे दुप्पट

Patil_p

‘जिओ’ 5-जी स्पीडसाठी मेगा प्लॅनच्या तयारीत

Patil_p

उत्पादीत देशाची माहिती द्या- केट

Patil_p

5-जी नेटवर्कच्या चाचणीचा मार्ग होणार मोकळा

Patil_p

‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चे व्हर्चुअल आयोजन डिसेंबरमध्ये

Patil_p
error: Content is protected !!