तरुण भारत

एलआयसी अध्यक्ष एम.आर.कुमार यांना मिळाली मुदतवाढ

वयाच्या 62 वर्षांपर्यंत ते या पदावर राहणार

मुंबई 

Advertisements

 देशातील सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) यांचे अध्यक्ष एम.आर.कुमार यांना 9 महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. ते या महिन्याच्या 30 तारखेला निवृत्त होणार आहेत. परंतु प्राप्त झालेल्या माहितीनुसार 13 मार्च 2022 पर्यंत त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे वयाच्या 62 वर्षांपर्यंत ते या पदावर राहणार असल्याचे सांगितले आहे.

एम्प्लॉयमेन्ट कमिटी ऑफ द कॅबिनेटने याबाबतचा एक आदेश सादर केला आहे. साधारणपणे एप्रिलमध्ये सरकारने विमा कंपन्यांच्या अध्यक्षाचे निवृत्तीचे वय वाढविले असून ते 62 इतके केले आहे. या प्रकारे एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांना दोन वर्षांचा आणखी वाढीव कालावधी मिळणार आहे.

एम.आर कुमार हे थेट झोनल मॅनेजर ते अध्यक्ष बनले आहेत. ते प्रथम एलआयसीचे अधिकारी राहिले होते. 14 मार्च 2019 रोजी अध्यक्ष बनले होते. परंतु एप्रिलमध्ये बदलण्यात आलेल्या नियमावलीनंतर फक्त एमडीच अध्यक्ष बनू शकत होते.

आयपीओची जबाबदारी

राजकुमार यांच्याकडे एलआयसीच्या आयपीओची जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडे खूप कालावधी आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये एलआयसीचा आयपीओ येणार असल्याचे संकेत आहेत. सरकार यातून 90 हजार कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे.

मोहंतींचा पत्ता होणार कट

एम.आर.कुमार यांना मुदतवाढ मिळाल्याने आता एस.के.मोहंती यांचा पत्ता कट झाला आहे. साधारणपणे या नियमावलीनुसार मोहंती अध्यक्षपदाचे दावेदार होते. कारण ते फेब्रुवारीमध्ये एमडी बनले होते आणि त्यांचा कार्यकालही अजून खूप बाकी होता. परंतु सध्याच्या नव्या नियमावलीनुसार त्यांना बाजूला केले आहे.

Related Stories

जिओ-एअरटेलच्याही पुढे व्होडाफोन-आयडिया

Patil_p

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat

हिरो सायकल्सची ऍटलासवर नजर

Patil_p

पडझडीचा काळ; पण…

Omkar B

एचडीएफसीचा निव्वळ नफा घटला

Patil_p

ओएलक्सकडून 250 जणांची कपात

Patil_p
error: Content is protected !!