तरुण भारत

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सीएमडींच्या वेतनात घट

नवी दिल्ली

 एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष आणि संचालक(सीएमडी) संजीव मेहता यांचे वार्षिक वेतन महामारीमुळे प्रभावीत झाले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ते 20.9 टक्क्यांनी कमी होत 16.36 कोटी रुपये राहिले आहे.

Advertisements

कंपनीने  आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएमडींच्या एकूण वेतनात 11.19 कोटी रुपयाचे वेतन आणि भत्ते, 2.02 कोटी रुपयाचा बोनस,1.69 कोटी रुपयाचा अतिरिक्त लाभांश आणि भविष्य निधीमध्ये 44 लाख कोटी रुपयाच्या योगदानाचा समावेश झाला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मेहता यांचे एकूण उत्पन्न 19.42 कोटी रुपये होते. ज्यामध्ये 12.46 कोटी रुपये वेतन, 3.31 कोटी रुपये बोनस, 3.20 कोटी रुपयांचा लाभांश आणि भविष्य निधी तसेच अन्य 0.45 कोटी रुपयांच्या योगदानाचा समावेश आहे.

Related Stories

‘नजारा’चे समभाग 81 टक्क्यांसोबत सुचीबद्ध

Patil_p

आरबीआयच्या निर्णयाने बँकिंग-आर्थिक क्षेत्र तेजीत

Patil_p

ऑनलाइन कंपन्यांसमोरील अडचणी व आव्हाने

Patil_p

व्यापारातील शेजारधर्म

Omkar B

गुंतवणूकदारांना 37.59 लाख कोटीचे नुकसान

Patil_p

मारुतीची एस क्रॉस बाजारात दाखलमारुतीची एस क्रॉस बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!