तरुण भारत

सेन्सेक्समध्ये 334 अंकांची घसरण

जागतिक नकारात्मक वातावरणाचा परिणाम ः निफ्टी 15,650 च्या खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी जागतिक बाजारांमधील नकारात्मक संकेतामुळे भारतीय बाजारात घसरण राहिली आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स बुधवारी 334 अंकांनी प्रभावीत झाला आहे. बाजारातील मजबूत हिस्सेदारी ठेवणाऱया कंपन्यांमध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांच्या समभागात घसरणीचे वातावरण राहिले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 333.93 अंकांसह 0.64 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 51,941.64 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेरपर्यंत 104.75 अंकांसोबत 0.67 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 15,635.35 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील सर्वाधिक दोन टक्क्यांनी नुकसानीत लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग राहिले आहेत. यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक आणि बजाज ऑटो यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टायटन, एचसीएल टेक आणि एशियन पेन्ट्ससह अन्य समभाग लाभात राहिले आहेत.

अभ्यासकांकडून सदरच्या घसरणीवर व्यक्त करण्यात आलेल्या मतांनुसार प्रमुख निर्देशांकामध्ये विक्रीत दबाव राहिला आहे. तसेच अमेरिकेतील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित सादर होणाऱया आकडेवारी अगोदरच नफा कमाई करण्यात आली आहे. या घटनेचाही परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

प्रमुख प्रभावीत क्षेत्र

बुधवारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक, वाहन आणि आरआयएलमधील विक्रीच्या दबावामुळे देशातील शेअर बाजारामध्ये तीव्र घसरणीची नोंद करण्यात आली आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये सोल, टोकीओ आणि हाँगकाँग हे नुकसानीत राहिले आहेत.

Related Stories

काँग्रेसला जेव्हा जाग येते…!

Patil_p

पुस्तकांना जीवनावश्यक सेवेचा दर्जा का असू नये ?

Patil_p

हें मी जाणें अंतरसाक्ष

Patil_p

माध्यम साक्षरतेचं चांगभलं!

Patil_p

पंतप्रधानांचा संकल्प अन् गोव्याची आत्मनिर्भरता

Patil_p

पतन पावलों अंधकूपीं

Patil_p
error: Content is protected !!