तरुण भारत

1400 रुपयांचे नाणे, 138 कोटीत विक्री

अमेरिकेत केवळ 20 डॉलर्स म्हणजेच 1400 रुपयांच्या नाण्याला इतकी मोठी बोली लागणार याचा अंदाजच कुणाला नव्हता. या सोन्याच्या नाण्याचा 138 कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला आहे. एक दुर्लभ तिकीटही 60 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे.

न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी 1993 मधील या डबल ईगल सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला. या नाण्याच्या बोलीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नाण्याला 18.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 138 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. कायदेशीरदृष्टय़ा डबल ईगलचे हे नाणे वैयक्तिक मालकीचे होते. साउथीबाय ऑक्शनमध्ये याचा लिलाव पार पडला आहे.

Advertisements

हे नाव शू डिझाइनयर आणि कलेक्टर स्टुअर्ट वीट्जमॅनकडून विकण्यात आले आहे. त्यांनी 2002 साली हे नाणे सुमारे 55 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होत. 20 डॉलर्स डबल ईकल सोन्याच्या या नाण्याच्या एका बाजूला उडणाऱया गरुडाचे चित्र आहे. दुसऱया बाजूला लिबर्टी आहे.

वीट्जमॅन यांनी मंगळवारी 1856 मध्ये सादर करण्यात आलेल्या ब्रिटिश गयाना वन-सेंट मॅजेंटा स्टॅम्पला 8.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 60 कोटी रुपयांमध्ये विकले आहे. या स्टॅम्पने इतिहासातील सर्वात मूल्यवान स्टॅम्प म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

सोन्याचे नाणे आणि स्टॅम्प खरेदीदार स्वतःचे नाव गुप्त ठेवू इच्छित असल्याने त्याच्याविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

अमेरिका : कोलोराडोच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 ठार

datta jadhav

मेक्सिको : 20, 548 नवे कोरोना रुग्ण; 1,539 मृत्यू

pradnya p

पाकच्या पंतप्रधानांची फजिती

Amit Kulkarni

चिंताजनक! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे तब्बल 52 हजार रुग्ण  

pradnya p

राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून बायडेन यांना उमेदवारी

datta jadhav

कोरोना संकटामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात

Patil_p
error: Content is protected !!