तरुण भारत

बोली भाषा संपणार, वनौषधींचे ज्ञान धोक्यात

झ्यूरिच विद्यापीठाचे संशोधन

जगात वनौषधींचे ज्ञान वेगाने गायब होण्याचा धोका आहे. यामुळे अनेक शतके जुन्या उपचारांचे ज्ञान धोक्यात आले आहे. यामागे जगातील विविध हिस्स्यांमध्ये स्थानिक बोलीभाषा संपण्याचे कारण आहे. बोली भाषा संपल्याने अनेक वनौषधींची माहिती पुन्हा कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. झ्यूरिच विद्यापीठाच्या संशोधनातून ही बाब समारे आली आहे.

Advertisements

संशोधनासाठी पथकाने भाषा आणि जैववैविध्यतेच्या आधारावर उत्तर अमेरिका, उत्तर-पश्चिम अमेजोनिया आणि न्यू गिनीमध्ये 230 स्थानिक बोलीभाषांशी निगडित 12 हजार वनौषधींचे अध्ययन केले आहे.

उत्तर अमेरिकेत 73 टक्के  औषधीय ज्ञान केवळ एका भाषेत, उत्तर-पश्चिम अमेजोनियामध्ये 91 टक्के आणि न्यू गिनीमध्ये 84 टक्के ज्ञान एकाच भाषेत आढळले जाते. बोलीभाषा संपल्याने वनौषधींचे पारंपारिक ज्ञान संपणार असल्याचे उद्गार डॉ. रॉड्रिगो यांनी काढले आहेत.

बोलीभाषांमध्ये निसर्गात आढळणाऱया वनौषधींचे मोठय़ा प्रमाणात ज्ञान असते. अशा स्थितीत स्थानिक बोलीभाषा संपल्याने कुठल्या झाडाला काय म्हटले जाते आणि त्याचे वैशिष्टय़ काय हे सांगणारा कुणीच मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार जगात 7,400 भाषांपैकी 30 टक्क्यांहून अधिक भाषा शतकाच्या अखेपर्यंत गायब होण्याची भीती आहे.

सद्यकाळात 1,900 हून अधिक स्थानिक बोलीभाषांचे 10 हजारांपेक्षाही अधिक वापरकर्ते आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने 2022-32 ला स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक घोषित केले आहे.

Related Stories

युरोप : संकट वाढतेच

Patil_p

डब्ल्यूएचओचे पथक चीन दौऱयावर

Patil_p

आकडा 3 कोटीच्या पार

Patil_p

‘रॉ’ प्रमुखांच्या भेटीने नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली वादात

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने ओलांडला 75 हजारांचा टप्पा

datta jadhav

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱयाची हत्या

Patil_p
error: Content is protected !!